Tuesday, 28 June 2016

कविता, कविता म्हणजे नक्की काय असतं…?

कविता, कविता म्हणजे नक्की काय असतं…?

 
कविता, कविता म्हणजे नक्की काय असतं...?

कविता म्हणजे कधी प्रेमाची गोडी,

कविता म्हणजे कधी प्रियसीची स्तुती,

तर कधी तिच्याकडे थेट प्रेमाची मागणी...


कविता म्हणजे आईची हाक,

कविता म्हणजे बाबांची दाट,

तर कधी मैत्रीची साथ...



कविता म्हणजे विचारांची गर्दी अफाट,

त्यात कमी शब्दांची छोटीशी वाट,

आणि मग भावनांची लागलेली विल्हेवाट...



कविता म्हणजे समाजातील दु:खाची लाट,

लोकांचे असणारे प्रश्न सतराशे साठ,

आणि या सर्वांवर ठरलेली आशेची एखादी सोनेरी पहाट...



कविता म्हणजे व्यक्त केलेला राग,

तरी कधीही न सांगितलेले प्रेम,

तर कधी जीवनाच्या वाटेवरील आशेचे असलेले किरण...

-: कृष्णाई :-


 


No comments:

Post a Comment