Chahawala.कॉम वर “कभी खुशी कभी गम”, “कभी
तुम कभी हम”, “कभी गोला कधी बम”, तर कधी “चिमणी उड आणि कावळा उड" असे नेहमीच काही
ना काही चाललेले असते. त्यातही कधी कोणाला बकरा करायचे, कोणाची तरी नक्कल करायची,
तर कधी कोणाची अक्कल काढायची म्हणुन मग त्यासाठी नव-नवीन शक्कल लढवायची असे काही
आता नवीन नाही. या सगळ्या गोष्टीचा उगम स्थान म्हणजे आमच्या मध्ये असलेली सदा
गोडबोले नावाची एक दुबई फाटयावरील (अगदी त्यांच्या घरीदेखील नकोशी झालेली) अशी लोकद्व्यापी
(लोकांना त्रासदायक देणारी) असे कॅracter. दुबई फाट्यावरील Chahawala.कॉम हे नाव देखील त्यानेच
दिलेले बरं का. कोणतही इंग्रजी अक्षर मराठी शब्दानेच सुरु करण्य़ाचा हा त्यांचा
नेहमीचा अट्टाहास. पण एखाद्या जागेला नाव देताना त्यांच्या डिक्शनरीतील नियम मात्र
बदलतात आणि ते नाव झगमगित वाटण्य़ासाठी इंग्लिश मध्ये असावं, असं त्याचं बिझुनेश
नोलेज सांगत. त्यांच्या या म्हणण्याला तो अगदी विठ्ठ्ल कामत यांच्या विठ्ठल
नावापासुन बनलेल्या विट्स नावाच्या हॉटेलचे, तर कधी अक्षय कुमार या अशा सगळ्य़ाच्या
कितीतरी लोकांचे नावं बदलण्याच्या आणि ठेवण्याच्या उदाहरणाचे नावासहित दाखले तयार
देतो.
तसं बाकी लोकांसाठी Chahawala.कॉम म्हणजे चांडाळ-चौकडी शिवाय
वेगळं असं काही नाही. तर आमच्या सगळांच्या घरातल्यासाठी बेकार, बेरोजगार, आणि
रिकाम टेकड्या लोकांचा फुकट गमजा मारण्याचा अड्डा म्हणजे हा Chahawala.कॉम. अगदी शाळेत असल्यापासुनच
सुरु झालेला हा Chahawala.कॉम आता आमच्यातील काहीजणाची
स्वत:ची मुले शाळेत जाऊ लागली तरी तसाच चालु आहे.
जसा Chahawala.कॉम शाळेपासुनचा तसाच हा सदा गोडबोले हा देखील अगदी शाळेपासुनचं
आमच्याबरोबर. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टी विषयी आणि खोड्या विषयी आम्हांला
पुर्णपणे माहिती असायची. तसंही सदा गोडबोले हे काही त्याच खरं नाव नाही पण तो एरवी
लोकांना पहिल्या भेटीत तरी हेच नाव सांगतो सदा गोडबोले. आणि पुढे त्याचे नाव ऎकुनच
समोरच्याला प्रश्न पडतो हे खरंच याचं नाव आहे की आपली खेचतोय की काय. कारण नाव
सांगतिल्यानंतर सदा हसायला सुरु होतो आणि त्यांच्या हसण्याचे खरे कारण मात्र
आम्हांला कधीच समजले नव्हते. सदा गोडबोले असं कुठे नाव असता का? त्यापुढे त्याचं
एक ठरलेल वाक्य असत की ज्यांच्यामुळे अगदी सोजवळ नाव असलेली व्यक्ती खरोखर तशी
नसते याची लगेचच जाणीव तो करुन देतो. आणि आपल्यातील क्वॉलिटी दाखवुन देतो.
(क्वॉलिटीच लायकी नाही) हा देखील त्याचाच शब्दप्रयोग. त्यामुळे प्रत्येकजण
त्याच्यापासुन नेहमीच दोन हात लांब राहण्यात धन्यता मानायचा.
असो पण या सदा गोडबोलेचे खरे नाव काय? किंवा ते काही वेगळे
असेल असं आम्हांला कधी वाटलं नाही. पण शाळेत असताना आम्ही बाकी सगळेजण प्रगति
पुस्तक लपवायचो ते मार्क्स कळु नये म्हणुन, पण हा सदा तेव्हा प्रगतिपुस्तकातील
मार्क्स नाही तर स्वत:चे नाव लपवण्यासाठी ते लपवायचा. आणि तसंही शाळेत आमच्या
कोणाच्याही ओळख ही आई-वडीलांनी ठेवलेल्या नावाने थोडीच व्हायची. नावाच्यां बाबतीतच
जर सांगायचं झालं तर आई-वडील हे फक्त “नावंच” ठेवण्यासाठी असतात, म्हणुन मग त्या
गोष्टीचा एवढा विचार करु नये, अशी कदाचित तेव्हाची समजुत असावी. म्हणुन मग
प्रत्येकांची ओळख ही त्यांच्या कर्तुत्वावरुन व्हायची. कदाचित तेव्हापासुन सदाला
हे नाव मिळाले असावे आणि त्याने तेच पुढे चालु ठेवलेले असावे, असा आमचा आपला समज.
शाळेत असताना त्याची चित्रकला फार सुंदर होती असा काही भाग
नाही पण तरीही त्यानी काढलेली चित्रे तशी सगळीकडे अगदी पाहण्यास आवर्जुन गर्दी
व्हायची. कारण त्या चित्रा बरोबर एक सोशल मैसेज असायचा की जो ज्याला सोसल त्याने
तेवढ्याच वाचायचा आणि बाकी उरलेला सोडुन द्यायचा. त्यांच्या या चित्रकारीते बरोबर
त्यानी केलेल्या कमेटस आणि त्यानी लोकांनी दिलेल्या नावामुळॆच तो जास्त लोकप्रिय
म्हणण्यापेक्षाही बर्य़ाचदा नकोसा व्हायचा. पण एवढे खरे लोकांना काही करुन हसवायचे
कसे हे त्याला चांगले ठाऊक होते. मग त्यासाठी तो काय-काय कोण-कोणत्या गोष्टी करेल
याचा मेळ नव्हता.
जसं हसवणं हा त्याचा छंद होता तसंच फसवणं हा छंद म्हणता
येणार नाही. पण सवय किंवा स्वभाव असंदेखील म्हणता येईल. अगदी त्यांच्याच भाषेत
सांगयचं झालं तर
“आपण दिलेला शब्द
पाळतो” आणि एखाद्या जाहिरीतीच्या सेलला जसं टर्मस अॅण्ड कडीशन अप्लाय असं लहान न
दिसणार्या अक्षरात असतं, अगदी तसंच आणि त्याप्रमाणेच, “आपण दिलेला शब्द पाळतोच (मोठ्या
आवाजात आणि) असे नाही ना(शक्य तेवढ्या बारीक आवाजात)” असा sसायलेंट मोड मध्ये तो
शेवट करत असतो. फसवणं हा छंद नाही म्हणयाच कारण म्हणजे तो मुद्दाम करतो असं म्हणता
येणार नाही, कारण त्याचे मागे त्यांची स्वत:ची एक अशी “सदा-चार-नीती” आहे.
त्यांच्या या निती प्रमाणे मित्रांमध्ये कोणतीही गोष्ट अगदी दिलखुलास पणे शेअर
केली जाते, मग मोबाईल, गाडी, चप्पल, शुज, मोजे, टोपी, शर्ट, पॅन्ट, जर्कींग, वॉच, टुथपेस्ट,
टॉवेल, अगदी अगदी सगळ्चं. हा भेटल्यानंतर प्रत्येक वेळी नवीन काही कोणाचे तरी घेऊन
आलेला असणार. आणखी एक वैशिष्टय म्हणजे तो ते बिनधास सांगतो की, ही वस्तु ह्यांची,
ती त्यांची. बर्याचदा तर त्यांच्याकडे त्यांची स्वत:ची फक्त एखादीच वस्तु असते,
की जी आपण समजु शकतो. त्यांच्या मते अशा देवाण-घेवाणीमुळे मित्र वाढतात, मैत्री
मजबुत होते, मित्र आपली आवर्जुन आठवण काढतात. जशी की आमचे काही मित्र थंडी आली,
तरी यांची आठवण काढतात कारण त्यांची स्वेटर, जर्कींग याने घेतल्यानंतर परत केलेले
नसतात, त्यामुळे थंडी किंवा पावसाळा सुरु झाला की त्या मित्रांचे त्याला फोन
येतात. किंवा एरवी पण जेव्हा कधी ते भेटतात तेव्हा हाच आवर्जुन आठवण मात्र नक्की
करुन देतो,
“अरे, तुझे ते
जर्कींगना माझ्याकडे अजुन तसेच पडुन आहे. कधी तरी घरी येऊन घेऊन जा. त्यामुळे
फसवणं हा त्यांचा काही हेतु नसतो हे मात्र नक्कीच यावरुन समजते. अशा पद्धतीने
त्यांच्याकडे किती लोकांच्या किती वस्तु असतील हे त्याला स्वत:ला सुध्दा ठाऊक
नसतील. त्यांच्या “सदा-चार-नीती” ची भारताच्या पर-राष्ट्र धोरणाविषयी सारख्या
गोष्टीबरोबरसुद्धा तो तुलना करतो. कारण पर-राष्ट्र धोरण हे आतंराष्ट्रीय स्तरावर
देशामध्ये संबंध सुधारण्यासाठी असतात तसे यांचे हे मैत्री पक्के करण्य़ाचे “सदा-चार-नीती”
धोरण असते.
असा हा आपल्या स्वत:च्या तत्वांवर चालणारा सदा काही
दिवसांपुर्वीच एन.सी.एल. (N.C.L.)
मध्ये जॉबला लागला. तिथे तो काय करतो किंवा
कोणत्या पोस्ट वर जॉबला आहे हे नक्की त्याला सांगता येऊ शकत नसावे, किंवा मग आम्ही
ते समजुन घेण्यास पात्र नसावो. पण थोड्याच दिवसात त्याने आम्हांला घरी बोलावले
काहीतरी दाखवण्य़ासाठी म्हणुन. आता काय दाखवणार हे देव जाणे असं म्हणतं शेवटी आम्ही
गेलो, तेव्हा त्याने एच.सी.एल. (H.C.L.) नावाचा बोर्ड दाखवला, आम्हांला
वाटलं आता H.C.L. तरी नक्की काय असणार आमच्या
सामान्य बुध्दीच्या कुवतीवर त्याला उत्तर दिले, H.C.L. म्हणजे हायड्रोक्लोरिक अॅसिड, त्यावर त्याने
सांगितले. चुकीचे आहे उत्तर...!!! H.C.L. म्हणजे Home Chemical Laboratory hहा आमच्यासाठी खरंतर मोठा शॉक
होता. तेव्हा कुठे आमचा त्यांच्यावर विश्वास बसला की हा खरंच आता एन.सी.एल. (N.C.L.) मध्ये जॉबला आहे. आणि त्याने तिथुन काही थोडे
सॅम्पल्स, अॅपॅरटस अॅसिड, केमिकल्स वगैरे असं सगळं काही आणुन खरंच आपली घरगुती
प्रयोगशाळा सुरु केली. आम्ही आजवर फक्त ऎकले होते, की शास्त्रद्न्य लोक हे वेडे
असतात (वेडे म्हणजे त्याच्या ध्येयाच्या द्रुष्टीने पेटुन उठलेले असतात.) आणि आज
मात्र खात्री पटली की, वेडे लोकच शास्त्रज्ञ होऊ शकतात.
त्यांच्याच दुसर्या दिवशी अगदी सकाळी,
सकाळी ६.३० च्या दरम्यान जोरजोराने कोणी तरी दार बडवतं होत. बघितलं तर हे महाशय!!
एवढया सकाळी काय
काम आहे विचारले, तर त्याने नवीन जीन्स पाहिजे त्यासाठी आलो होतो असं त्याने
सांगितले.
आता ह्याला नाही
तर म्हणु शकत नाही, जीन्स दिली आणि म्हटलं आणखी मागायच्या आधी जा बाबा लवकरं...
पुढे त्याने लवकरात लवकर घरी ये, सांगुन निघुन गेला.
आता काय काम आहे,
म्हणुन विचारले, बाहेर जायचे आहे. एवढ सांगुन निघुन गेला.
पुढे
त्यांच्याबरोबर गेलो, तेव्हा समजले, सदा आता नवरदेव होणार आहे आणि त्यासाठी हा
हातरुमाल पासुन ते सेंट, मोजे, शर्ट, बेल्ट उधारी-तत्वावर घेऊन तयार झाला.
तेव्हा तिथेच सगळ
खरं सांगुन टाकावे असं वाटलं. पण तेव्हा त्यांच्या घराच्यांकडुन त्यांचे खरं नाव
समजले. त्याचे खरे नाव “धवन सदाशिव
गोडवोले”, पण त्याला स्वत:ला धवन हा शब्द म्हणता येत नाही तो ध-चा उच्चार
करु शकत नाही, किंवा वेगळंच काहीतरी म्हणतो, असं त्याने स्वतं आम्हांला सांगितलं.
तेही तेव्हा जेव्हा आम्ही त्याला मुलीचे नाव काय आहे ते विचारल्यानंतर. त्यामुळे
या गोष्टीला पर्याय म्हणुन किंवा लहानपणी त्यांच्या वडीलाच्या नावानेच त्यांची ओळख
निर्माण झाली, अगदी आमच्या पैकी बर्याच जणाप्रमाणे आणि फरक फक्त एवढाच त्याने तेच
नाव पुढे चालु ठेवले सदा गोडबोले....
या धक्क्यातुन
सावरतो तोच त्यांच्या होणार्या पत्नीचे नाव “राधा” आहे असे समजले, आता हया
गोष्टीसाठी तो काय शक्कल लढवणार ते बघावे लागेल, नाहीतर तो लग्नात काय नाव घेईल हे
कोणीच सांगु शकत नाही.
त्यामुळे अजुन
देखील या धक्कयातुन आम्ही सावारलेलो नाही.
कृष्णा अंकुश खैरे
|
No comments:
Post a Comment