Thursday 16 June 2016

विरहाच्या ओढीला...

विरहाच्या ओढीला... 

विरहाच्या ओढीला, बुडत्यांच्या बोटीला....
सागराचा किनारा, तुझ्या माझ्या प्रेमवेडीला

वेडा-पिश्यासारखा धावतो,कोणा-कोणाच्या भेटीला
ओढीला सुदधा आहे ओढ, पण काहीच सापडत नाही तोड

कशाला जावं उगाच त्या गावाला ???
दु:खाच्या पल्याड, सुखाच्या अल्याड...

छेडावे तेच सुर, कोणाच्या तरी कंठात
आणि व्हावे अलग, फक्त एकाच क्षणात

जाऊ द्या आता ओढीला, जाऊ द्या आता ओढीला
पुन्हा परतीच्या भेटीला, सांगा त्या बुडत्या बोटीला 
 
येईल पुन्हा भेटीला, जेव्हा असेल मी वयाच्या साठीला...
तेव्हा पुन्हा आठवू, दोघेही पुन्हा याच भेटीला....

-: कृष्णाई :-

No comments:

Post a Comment