नेहमी सवयीप्रमाणे आमच्या
चहावाला.कॉम वर एक-एक मित्र जमत असतानाच तेव्हा शाळेतील एक-दोन दहावीचे मित्र
भेटले. मग तेव्हा सुरु झाल्या त्या दहावीच्या दिवसाच्या एक एक आठवणी निघत गप्पा
सुरु झाल्या. तेव्हा एकाने बोलता बोलता दहावी च्या इंग्रजीच्या पेपरचा विषय काढला.
नववी, दहावीमध्ये असताना इंग्रजी या विषयाची विशेष अशी भीती वाटायची. ती अशासाठी
की इंग्लीश काय आपल्याला येवो अगर न येवो त्याने आपल्याला तसा फ़ारसा असा काही फ़रक
पडत नाही, पण मग काही झाले तरी इंग्लीशमध्ये फ़ेल मात्र नाही व्हायचे. मग त्यासाठी
अशावेळी आम्ही आपले हक्काचे असे मार्क शोधायचो (हक्कांचे म्हणजे थोडे फ़ार लिहिले
तरी सहज मार्क दयावे लागतात असे) अर्थांत असे मार्क आपल्याकडील प्रश्नपत्रिकांमध्ये
असतात की जेणेकरुन जास्त कष्ट न घेता ते सहजपणे मार्क मिळु शकतील आणि
आमच्यांसारख्या बर्याच जणांचा किमान पासिंगचा फ़ंडा तरी यशस्वी होईल.
तर असाच एक
प्रश्न तेव्हा असायचा आणि तो म्हणजे लेटर रायटिंग...
आता या लेटर रायटिंगला असायचे जेमतेम ७ ते ८ मार्क. त्यामध्ये
नाव आणि पत्ता (की जो आमच्या सर्व मित्रांचा ठरलेला असायचा स्वतःचा, आणि समोरच्या
चा सुदधा) की ज्याला काही एक किंवा दोन मार्क हे फ़िक्स भेटणार यांची खात्री असायची,
त्यानंतर लेटर च्या सबजेकटसाठी १ मार्क असणारचं, मग तो सबजेक्ट प्रश्नपत्रिकेमध्ये
शोधायचा आणि लिहायचा, असे करत ३ ते ४ मार्क व्हायचे, आता आणखी एक आपल्या हक्कांचा
मार्क मिळवायचा की त्याला थोडे कष्ट होते ते म्हणजे रेफ़रण्स (Reference) .
आता हा रेफ़रण्स काय लिहावा ही
यासाठी आमची मोठी पंचायीत व्हायची. त्या वर एक उत्तम पर्याय आमच्यातीलच एका हुशार
मित्राने आम्हांला कानमंत्र की दिला तो म्हणजे रेफ़रण्स म्हणजे कुठल्याही आपल्या
आवडत्या हिरोच किंवा नाव मोठया अशा प्रतिष्ठित व्यक्तीच नाव टाकायचे मग ते कुणीही
असो, असा गुरुमंत्र त्याला त्याच्या गुरुनी दिला. . तेव्हा नाव तर खुप मोठया-मोठया
व्यक्तीची सुचायची अगदी अमिताभ बच्चन पासुन सचिन तेंडुलकर, आणि रजनीकांत पासुन
सलमान खान पर्यंत. पण आम्ही शक्यतो असं नाव शोधाण्याचा प्रयत्न करायचो की, जे
जेणेकरुन लक्षात ठेवायला सोपे असेल, पेपर लगेच आठवेल, तेही स्पेलिंग मिस्टेक न
होता, आणि त्याचबरोबरीने समोरच्यालाही ते आवडेल आणि पटेल सुद्धा. आणि आणखी एक
मार्क आरामात मिळुन जाईल.
आमच्यासाठी
एवढाच काय तो तेव्हा रेफ़रण्सचा अर्थ तेव्हा होता. पण आता जेव्हा ईन्टरशिप, जॉब, किंवा
प्रोजेक्ट साठी जेव्हा मोठं-मोठया कंपन्यामध्ये जेव्हा अॅप्लाय करावा लागतो
तेव्हा खरे समजते की रेफ़रण्स म्हणजे काय असते ???
अशावेळी तुमचा
रेफ़रण्स जर कोणी छोटी व्यक्ती (छोटी म्हणजे कंपनीतील पोस्टने) असेल तर तुमचे काम
होण्याची शक्यता फ़ारच कमी. जेवढा मोठा तुमचा रेफ़रण्स तेवढीच तुमची काम पुर्ण
होण्याची जास्तीत जास्त शक्यता (ग्यारंटी). पण त्याहुनही आणखी मोठी गोष्ट म्हणजे
जर तुमच्याकडे रेफ़रण्सचं नसेल तर कंपनी जाण्याची देखील बर्याचदा तसदी घ्यावी लागत
कारण तेव्हा गेटवरुनच परत पाठवण्याची सोय केलेली असते.
कधी काळी वाटायचे की रेफ़रण्स म्हणजे फ़क्त एखादया मोठया व्यक्तीचे नाव, नंतर वाटायचे की रेफ़रण्स म्हणजे अशी एखादी व्यक्ती की जिच्या जबाबदारीवर आपल्याला कंपनीत घेतले जाते. पण आता हा समज देखील बदलायला जास्त वेळ लागेल अस वाटत नाही. कारण जो त्याच्या करियरची शिक्षण संपल्यानंतर आत्ता कुठे सुरुवात करणार आहे, त्याला तिथे रेफ़रण्स म्हणुन देता येईल अशी कोणी ओळखीची व्यक्ती मिळणे म्हणजे तशी फ़ारच कठीण गोष्ट आहे. आणि मग जोपर्यंत असे तुम्हांला असा कोणी रेफ़रण्स मिळ्त नाही, किंवा रेफ़र करत नाही तोपर्यंत एक तर इंटरव्युह द्या नाही तर रेफ़रण्स मिळे पर्यंत जसे बाकीचे घरी बसलेले आहेत तसेच थांबा कारण शिक्षण चांगल्या मार्कांनी संपवून देखील आमचे काही मित्र वाट बघत आहेत ती एका चांगल्या जॉबची.
-कृष्णा खैरे
No comments:
Post a Comment