Saturday 14 May 2016

काळोखी रात्र


काळोखी रात्र

जगाची रात्र झाल्यावर,
 आमचा दिवस सुरु व्हायचा
आणि अमावस्या जरी असली,
तरी आम्हांला मात्र पोर्णिमेचा चंद्र दिसायचा

तुझं बरं आहे, असे म्हणत ती हळुच निघुन जायची,
आणि मला मात्र एकाच क्षणात घायाळ करुन जायची

ती रात्रही हसायची, तुझ्या-माझ्या कडे बघुन
पण मनातुन तीही झुरायची, तुला माझ्यासोबत पाहुन

आता हात हाती तुझा असाच राहू दे
पाहिलेस दुःख तू सोबतीत माझ्या...
आता सूखही मला तुझ्यासवेच पाहू दे...

पुन्हा तिला पाहिले,  आणि तिने जाण्याचे चिन्ह दावले
तसा जीव गार झाला...
पुन्हा तिच्या एकाच नजरेत, तो तसाच ठार झाला...

तसं तू  रोजच यायला हवंस असं काही नाही,
पण चंद्राला ग्रहण लागल म्हणुन,
दोष मात्र रात्रीलाच राहील...


-: कृष्णाई :-     

 


No comments:

Post a Comment