Friday 14 November 2014

द्यायची ना एक ठेवून...

“ द्यायाची ना एक ठेवुन....” हा डायलॉग म्हणजे नक्कीच एखाद्या पिक्चर मधला असेल किंवा एखाद्या टपोरी पदधतीच्या भाईगिरी करणार्‍या मुलांच्या तोंडुन निघलेला असेल असंच वाटत, बरोबर ना. अगदी आमचाही असाच समज होता. हो अगदी समजच कारण त्याला गैरसमज तोपर्यंत म्हणता येत नाही जोवर आपण ते चुकीचे ठरवत नाही.
तसं “द्यायाच्या ना दोन ठेवुन” हे वाक्य जर मुलांच्या तोंडी ऎकलं तर तसं आश्चर्य वाटणार नाही, कारण तशी जरा हमरी-तुमरी झाली की आपसुकचं असं बोललं जातं की,
आता देईल हा एक ठेवुन. आणि अर्ध्या तासाने परत त्याच मित्राच्या गळ्यात गळे घालुन तेच दोघे फिरत असणार.
          हा आता हेच वाक्य एखाद्या मुलींच्या तोंडी ऎकायला आलं तर मग कसं वाटेल.
हो हो.... अगदी मुलींची किंवा मुलांची यावर मक्कतेदारी किंवा आम्हीच म्हटलं पाहिजे. मुली कशा बोलु शकतात, अशातला काही एक भाग नाही.
असो. असाच आमचादेखील समज असणार्‍या या समजुतीला एका आणि एकाच मजेशीर महाभागाने गैरसमज ठरवले, ती म्हणजे हम्म्म....... जाऊ द्या ना नावात तसंही काय? हे देखील त्याच महाभागाचं म्हणण. तसंही नावावरुन आपल्या कडे फारच कमी लोकांची ओळख होत असावी. त्यामुळे आमच्या कडे त्या महाभागाची ओळखदेखील तिच्या स्वभावावरुनच होते. रुद्ररुपातील कालिका पासुन ते चंडीका देवी पर्यंत सगळी नावे आठवडयाच्या वारानुसार तिच्याबद्दल बदलत असतात.



कॉलेजच्या सुरुवातीचे दिवस प्रत्येकासाठीच आठवणीचे असतात, ते का त्यासाठी प्रत्येकाचीच आपली वेगळी कारणे असतात. आमचीही आपली “द्यायची ना एक ठेवुन” हा डायलॉग ऎकण्याची पहिली वेळ तीच. नवीनच कॉलेज सुरु झाल्यामुळे आम्ही कधी नव्हे ते लेक्चरला बसलो होतो. लेक्चर बोरच होत होते, तेवढ्यात बाहेरुन आम्हांला कोणीतरी “द्यायची ना मग एक ठेवुन” असा जोर जोरात ओरडत दोन मुली वर्गात शिरत असल्याचे पाहिले. त्यातील एक शांतपणे ऎकत होती, तर दुसरी तिला सांगत होती, “द्‍यायची ना एक ठेवुन.”
बाप रे, म्हणत. आम्ही सगळे बघतच राहिलो होतो. त्या दोघीनाही समजले की आत मध्ये लेक्चर सुरु आहे मग काय लेक्चररनीही चार शब्द ऎकवले आणि आल्या पावली उलट फिरवले. तेव्हा हसण्याचा मोह काही आम्हांला टाळता आला नाही, पण तो जर टाळला असता तर देवच पावला असता, पण आमच्यावर कृपा ठेवेल तो देव कसला ना... आम्ही आपले कधीही हसायला न मिळाल्यासारखे खिंदळत राहिलो. पुढे लेक्चर संपले, आता आमच्यातील एकाने त्या दोन मुली दिसल्याबरोबर तो म्हटला, “ये त्या बघं, द्‍यायची ना एक ठेवुन वाली...” असं म्हणुन परत जोरजोराने हसु लागलो. ते हसणे हसणे सुरु होते, तोवर त्यांच्यातील एक जण आमच्याकडे आणि आम्हांला ऎकवु लागणार तोपर्यंत दुसर्‍या मुलीने तिला थांबवले नाहीतर आमची काही खैर नव्हतीच. आता पुढे ह्याही आमच्या वर्गात इथपर्यंत ठीक होतं पण पुढे जाऊन प्रॅक्टील आणि इतर गोष्टीमध्येही एकत्रच यायला सुरुवात झाली. बरं त्या अभ्यासतही हुशार, आता शेवटी मुलीचं न त्या. आपण आमचं फारसं काही त्यांच्यावाचुन अडत नाही अशा तोर्‍यात आम्ही वावरत होतो आणि त्याचही मत आमच्याविषयी काही फार वेगळ असं नसावं. नंतर दिवसा जात असतानाच सबमिशन, प्रॅक्टील, प्रोजेक्ट असं एक-एक सुरु झालं जे की जन्मात कधी आमच्याकडुन झालं नाही, आणि त्यातही आम्ही सगळे एकाच ग्रुप मध्ये आणि सर्व काही वेळेच्या अगोदर पुर्ण करण्याच्या त्यांच्या गुणधर्मा प्रमाणे त्या वागत होत्या, आणि आम्हीही कधीही ऎनवेळी सगळ्य़ा गोष्टीची तयारी करण्य़ाच्या आमच्या परंपरेला जागलो होतो.   आता मात्र कठीण प्रसंग ओढावला होता. आता एकच आशेचा किरण होता असं म्हणता येणार नाही पण लवकरात लवकर संकटातुन निघायचे असेल, मदतीसाठी नक्कीच विचारपुस करण्याची गरज होती. त्यांच्या ग्रुपमध्ये देखील आत्तापर्यंत ही गोष्ट समजली होती की, आमचीच परिस्थिती ऎन खिंडीत अडकलेल्या सैन्याप्रमाणे झाली आहे, आणि आम्हांला मदतीच नितांत गरज आहे. शेवटी अखेरीस नाईलाज म्हणुन आम्हीही या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी इकडुन-तिकडुन हळुहळु बोलणी सुरु करत कॅन्टीन मध्ये एक सगळ्याची मिटींग घेण्याची ठरली. पण ती तिथे काही झाली नाही त्यालाही काही अडचणीच आल्या. अखेरीस कॉलेज संपल्यानंतर संध्याकाळी सगळे ग्राऊंडवर भेटुन बोलणी सुरु झाली. तेव्हा त्यांनी सगळ्या असाईनमेण्ट, प्रॅक्टील, प्रोजेक्ट यासगळ्यात मदत केली जाईल असे मान्य देखील झाले. असं सगळ काही चांगले चालु आहे वाटत असतानाच. “द‍यायच्या ना दोन ठेवुन ने” मध्ये विषय तोडत आमच्या काही अटी आहेत त्या पण मान्य कराव्या लागतील.
हे ऎकले आणि सगळ्या मुलाचे कान टवकारले, पण आता काय करणार ऎकवा, काय अटी आहेत त्या ऎवढे सांगितले. कारण आता नाही कसे म्हणणार, तीच तर त्यांचीच लीडर होती, त्यातही हुशार.
पुढे अटी त्यांनी सांगितल्या, अटी तशा साध्या होत्या, (खरंतर साध्या होत्या असं म्हणता येणार नाही पण नाही म्हणुन सांगता कोणाला) की जेणेकरुन प्रॅक्टील आणि इक्झामच्यावेळी मदत, दोन्ही ग्रुप एकत्र राहतील आणि कधीही कोणतीही अडचण आली तर सगळे एकत्र असतील मग लेक्चरचा प्रोब्लेम असु किंवा कोणताही.
आम्हीसुदधा हो म्हटलं. म्हटलं नुसतं हो म्हण्याला काय जातंय, पुढचं पुढं बघता येईल. पण खरं तर त्या गोष्टीमध्ये दम होता. तेव्हापासुन खरा ग्रुप बनत गेला आणि कोणताही प्रोब्लेम आला तरी सगळे एकत्र असल्यामुळे त्याचे सोल्युशन मिळायचे. म्हणुन “द्यायचा ना दोन ठेवुन” तिचंच कदाचित हे कौशल्य असावं, कोणाच्याही मदत धावुन जाणे हा तिचा गुण होता मग वेळप्रसंगी ती दोन देण्यास सुद्धा मागे सरत नसायची. त्यामुळे ती आमच्यातील डेरर आणि टेरर अशी होती. ती भांडकुदळी वगैरे आहे असे देखील काहीचे म्हणणे असायचे, पण आमच्या मते चुकाच्या गोष्टी निमुटपणे न सहन करता त्यावर कडक शब्दात भाष्य करणे हाच तिचा स्वभाव होता. त्यामुळे “द्यायचा ना दोन ठेवुन...” च्या या वाक्याचे पुढे कौतुकच वाटु लागले. पण आता भीती नाही. 


कृष्णा अंकुश खैरे 

No comments:

Post a Comment