Wednesday 27 April 2016

तु असताना...


तु असताना...


तु असताना मनाला भुरळ घालायचीस
आणि मग
तु नसताना थंड धुके पडायची

तु असताना गार वारा होऊन वहायचीस,
आणि मग
तु नसताना मलाही स्वत: बरोबर वाह्वुन न्याचीस

तु असताना हे जग किती शांत असं असतं,
आणि मग
तु नसताना इथं तिसरं महायुध्द सुरु असतं

तु असताना दुसरं काही आठवत नाही,
आणि मग
तु नसताना तुझ्याशिवाय बाकी काही दिसत नाही

तु असलीस की बाकी कशाची उणीव भासत नाही,
आणि मग
तु नसलीस की बाकी कशाचा उपयोगही राह्त नाही

तु भेटलीस तर तुझ्यासोबत माझं सुख
आणि मग
जर तु नाही भेटलीस तर ; तुझ्या सुखातच माझं सुखं...

-: कृष्णाई :-

No comments:

Post a Comment