Saturday 22 October 2016

तुझी माझी भेट


तुझी माझी भेट

तुझी माझी भेट तशी फार होत नाही
झालीच तरी तेव्हा बोलणं संपत नाही

तुला घाई असते नेहमीच जाण्याची,
मीही वाट पाह्त असतो तुला परत पाहण्याची

तुझं येणं जणु काळ्भोरं आभळं भरुन येण्यासारखं
आणि काही क्षणातच बरसुन पांढरंशुभ्र झाल्यासारखं 

तु सोबत असतेस अगदी त्या मृगजळांसारखी,
दुर असुन सुध्दा मला मात्र सोबतच भासणारी,

तु सोबत असताना तुला चिडवणं काही खास असतं,
आणि तेव्हा तुझं रागवलेलं पाहणं एकदम क्लासं असतं

तुझ्यासोबत स्पर्धा करायला नेहमीच आवडतं,
पणं तेव्हा तुझ्याशी जिंकण्यापेक्षा हरण्यातचं छान वाटतं

 तु शब्द जाणतेस, आणि फक्त ते मांडतो
म्हणुन तुला भावणारा मी, इतरांना मात्र कारकुनच वाटतो.

मला नेहमी सोबत भासणारी, तरीही दुर असणारी
जीवाला हुर्र्हुर्र लावणारी, येणार आहे तरीही वाट पहायला लावणारी

जणुकाही नदी सारखी डोंगरातुन निघणारी,
आणि अथांग समुद्राच्या मिलनांसाठी
दर्‍या खोर्‍यातुन खळखळत बेफान वाहणारी,
ती नदी म्हणजे जणु काही तुच...

-: कृष्णाई :-

 

No comments:

Post a Comment