Tuesday 21 June 2016

हल्ली लिहणं तसं फारसं होत नाही… 
हल्ली लिहणं तसं फारसं होत नाही...

हल्ली लिहणं,
लिहणं तसं फारसं होत नाही
म्हणुन काही,

प्रेम कमी झालं असंही काही नाही...
का कुणासं ठाऊक,

पणं आता स्वत:कडे पाहणही तसं फारसं होत नाही
आणि उगाचचं विचारात गुरफटत जाणं
ते देखील आता सहन होत नाही

कधी कधी वाटत देखील एखादं प्रेमाने लेटर लिहावं
पण ई-मेल आणि चॅट मधुन नक्कीच वेळ मिळत नाही...
आणि मिळालाच कधी वेळ तरी

शब्दांचे वेडे-वाकडे हेलकावे खाणं आता जमत नाही...
शेवटी विचार करण्यातुन काही होत नाही,
पण म्हणुन विचार करणं थांबत नाही...

संपुन जाईल;
 संपुन जाईल सगळं एकेदिवशी
पण म्हणुन काही वाट पाहणं थांबत नाही...
 -कृष्णा खैरे-
                                                                                        

No comments:

Post a Comment