Tuesday 4 February 2014

जन्मदाता बाप

दिला ज्यांनी आधार, पहिल्या पावलांपासून;
प्रत्येक पावलाला...!

दाखवली दिशा ज्यांनी आयुष्यांतील प्रत्येक
वळणांवर...

दिली साथ ज्यांनी जीवनातील चढ-उतारांना

दिली ताकद ज्यांनी आर्थिकच नव्हे, तर
मानसिक पाठीब्यांची,

दिली प्रेरणा ज्यांनी कष्टांतुन स्वर्ग निर्माण करण्याची,

दिली ओळख करून जगांची,
शिक्षेतून त्याचबरोबर शिक्षणातुन ;

दिली पंखात ताकद या भरारी घेण्याची,
आव्हाने पेलण्याची;

दिला आत्मविश्वास हा संकटे  झेलण्याचा,
आणि निधड्या छातीने जग जिकंण्याचा;

दाखविले जग ज्यांनी,
त्या जन्म: दात्या बापाचे स्थान
आमच्यासाठी देवाहून कमी नाही;

पण त्यांच्यासाठी आजवर,
आम्ही काय केले ?
हे मात्र आम्हांलाही ठाऊक नाही...!!!
                                           - कृष्णा अंकुश खैरे

No comments:

Post a Comment