Monday 22 August 2016

तुझ्यावर लिहिण्यासारखं…तुझ्यावर लिहिण्यासारखं

तुझ्यावर लिहिण्यासारखं बरचं काही आहे,
पण सारचं कसं, तसं लिहता येतं नाही...

तुझ्याबरोबर बोलायचंही खुप सारं असतं,
पण तु असताना नेमका, नेमका विषयचं सुचतं नाही...

तु नसतेस तेव्हा खुप काही ठरवतो मनाशी,
कधी भांडतो स्वत:शी, अन वेगवेगळे खेळ मांडतो तुझ्याशी

प्रश्न पडतात खुप सारे, कदाचित उत्तरे त्याची
तुच असशील, माझ्याही नकळत तुही ती देत असशील

तुला आडे-वेडे घ्यायला जमतात, पण मला ते समजत नाही;
कारण सरळ विचारांशिवाय आमचे घोडे पुढे चालत नाही

तुझे रुसवे-फुगवे आहेत सारेच मान्य, पण त्यावर पर्यांय उमजत नाही
तेही होतील पुर्ण, जर असेल तुझी साथ शेवटपर्यंत

तुला भेटण्याची ओढ-ही असते नेहमीच, म्हणुन कारणेही शोधतो नवनवी,
आता तीही संपतील, फक्त कधी ह्यांची आता वाट पहायची...


-: कृष्णाई :-


No comments:

Post a Comment