Thursday 14 August 2014

ये ऎसा क्यों है...?



          आपल्या स्वत:च्या धुंदीत जगायला काही लोकांना आवडत त्याहीपेक्षा त्यांना तेच चांगल जमतं आणि त्यानाच ते चांगल जमुही शकत. त्यामुळे अशा लोकांचा बर्‍याचदा हेवा देखील वाटत राह्तो कसे काय हे एवढे रिलॅक्स राहु शकतात ? त्यांना तसा बाकी जगाशी संबंध नसतो अशातलाही भाग नाही पण ते आपलं जे काही चालु असते त्यात ते रमलेले असतात आणि बाकी तिकडे जगात काही घडत असु त्याचा ह्यांना तिळभर कसला पण कण भर आणि अणु-रेणु एवढा ही फरक पडत नाही. हे सगळे सांगण्यामागचे कारण म्हणजे असाच आमचा एक मित्र जो स्वत:च्या धुंदीत असण्यापेक्षाही एका वेगळ्या तंद्रीत किंवा भावविश्वात गुंफलेला असतो असे म्हटले तरी हरकत नाही. हा असा मित्र कधी भेटला हे नीटसं आठवत नाही किंवा तसे ते सांगुदेखील शकत नाही. पण तो भेटल्यापासुन काही प्रश्न मात्र नक्कीच भेटले, हा असा कसा? हा असाच राहणार का?वगैरे, वगैरे.कारण ही प्रश्नावली तशी बरीच मोठी आहे. पण त्यांचा जुना एखादा मित्र कधी भेटला तर एवढे मात्र नक्की म्हणतो की, अजिबात नाही बदलला रे अगदी आहे तसाच आहेस.

           हे सगळं असं काही जरी असलं तरी एवढ मात्र खरं होते की माणसाने किती शांत किंवा कुल असावं हे त्यांच्याकडुन शिकण्यास हरकत नाही. कदाचित तो गांधीजीच्या अहिंसावादी तत्वांचा तो मोठा समर्थक किंवा पालनकरता असावा असे नेहमीच सगळे त्याला म्हणत असतो. त्याला कोणत्या शिक्षकाने कितीही ओरडा, रागवा हा त्यांना उलट सोडा पण सरळ सुध्दा उत्तर देणार नाही. त्याला मुलांनी चिडवा नाहीतर आणखी त्यांच्यावर कमेंट पास करा नाहीतर त्याचं कोणाबरोबर तरी अफेअर आहे असं म्हणा, हे आपले आपल्या विश्वात गुरफटलेले बाकीचे काय म्हणत आहे ह्याचा त्याला फरक पडत नसायचा. मग सगळे शांत झाल्यानंतर काय झाले का म्हणुन विचारायचा ? त्यामुळे त्याला चिडवण्याच्या फंद्यात पुढे कोण पडत नसे.

 त्यांच्या बाबतीत एक गोष्ट प्रामुख्याने सांगायची झाली तर हा रोज काहीना काही धुंद गुणगुणत असतोच. अगदी दिवसाच्या प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी पण तो ते गुणगुणत असताना दुसर्‍या कोणाला त्रास होत नाही यांच्याकडेही लक्ष देतो पण स्वत:च गुणगुणने लाजुन किंवा घाबरुन तो अजिबात थांववत नाही. त्यांचे गुणगुणने लायब्ररीपासुन ते लेक्चर आणि मैदानापासुन ते टायलेट अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असतेच.

          त्यांच्या गाणं गुणगुण्यामध्ये जसे सातत्य असते तसेच त्यात काही सामाईक किंवा विशेष असेही पाईंट असतात. म्हणजे उगीचच गुणगुण्याचे म्हणुन टाइमपासही तो करत नाही. त्यातली एक गोष्ट अशी की रोज लेक्चर किंवा प्रॅक्टील संपले म्हणजे भांडयात पडलेला जीव मोकळा झाला असे वाटले की, त्याचे “जिंदगी” ह्या शब्दावरुनच गाणं सुरु होते. तो जे कुठले गाणे म्हणेल त्यात जिंन्दगी हा शब्द असतोच असतो आणि त्यांच्याकडुन गाणी रिपीट देखील होत नाहीत हे विशेष. त्याच्या ह्या गाण्याच्या शौक मुळे तो आमचा चालता फिरता आर.जे. तर आहेच त्याबरोबरच फरमाईश गाणी सुचवणारा आणि गाणारा गायक देखील आहे. त्यांच्या या गाण्याच्या आवडीमुळे गाण्याच्या भॆंड्या किंवा स्पर्धामध्ये मात्र ह्याला विशेष मागणी असते. ह्या अशा गायका मुळे आजवर गाण्याच्या स्पर्धामध्ये आम्हांला कोणीही हरवु शकले नाही एवढे मात्र खरे.

- कृष्णा अंकुश खैरे

No comments:

Post a Comment