Wednesday 6 April 2016

डायरीतील पानं






          रात्री १० ते ११ च्या सुमारास व्हॉट्स अप च्या मेसेजसने मोबाईल शांत राहील, अशी बाब आता शक्यतो घडत नाही. कारण बर्‍याच ग्रुपमधील लोकांना जणु काही सकाळचं झालेली असते आणि तिथुन पुढे हे ग्रुप मेसेज रात्री कितीही वाजेपर्यंत चालु राह्तात, आणि या सगळ्यात आता नवीन असे काहीच नाही. अशाच प्रकारचे ग्रुप चॅट सुरु असताना आमच्या एका मित्राने मेसेज केला, good night, busy in diary writing….
                    असा मेसेज वाचुन आमच्यातील प्रत्येकाला शॉकच बसला की, हा एवढा हुशार, सिन्सियर किंवा डायरी वगैरे लिहिण्या इतपत विचारवंत कसं काय होऊ शकतो ??? कारण एरवी एका पानाची असाइमेण्ट किंवा प्रॅक्टील लिहण्यास सुद्धा ज्यांच्या नाकी नऊ येतात तो आज चक्क डायरी लिहितोय..... आणि नवीन वर्ष सुरु होऊनदेखील आता जवळपास दोन-तीन उलटुन गेलेले, त्यामुळे हा विषय आता फक्त इथेच थांबणारा नव्हता एवढं नक्की.

         आणि तसंही डायरी लिहिण्याची लहर आपल्यापैंकी अगदी प्रत्येकालाच कधी ना कधी तरी नक्कीच येते. मग ती अगदी नवीन वर्ष सुरु होताना नवीन संकल्प म्हणुन असेल किंवा मग एखादी आठवण मनापासुन साठवावीशी वाटली म्हणुन, तर कधी एखादे आत्मचरित्र, आत्मवृत्त वाचुन ऊत्सफुर्तपणे का होईना, पण या ना त्या कोणत्याही कारणाने डायरी लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न आपल्यापैंकी प्रत्येक जण हा करतच असतो.

         आता पुढे त्या रात्री हा माणुस डायरी का किंवा कशी काय लिहु शकतो या गोष्टीवर गहन चर्चासत्र झालं खरं पण त्याच उत्तर देण्यास तो काही परत आला नाही. आणि आमची सर्वांची उत्सुकता आता अगदी शिगेला पोहचली होती. आता या प्रश्‍नच उत्तर जाणुन घेण्यासाठी सगळेचजण दुसर्‍या दिवशी त्याला भेटण्यासाठी आतुर होते.

        दुसर्‍या दिवशी तो भेटल्याबरोबर त्याच्या भोवती सर्वांनी गर्‍हाडा घातला आणि रिगंणात घेऊन अगदी प्रथेप्रमाणे चौकशी सुरु झाली, आणि तेव्हा त्याने अगदी त्यांच्याच स्टाईल मध्ये उत्तर दिले,
I write a diary, when I fall in Love and start to love someone...... आणि नंतर एकाने लगेच त्याला दुसरा प्रश्न विचारला (म्हणजे तोडक-मोडक इंग्रजी जुळवत),
Then when you read a diary? त्यावर त्याने सांगितले,
 When I fail in Love or at the end of love…..
त्याच हे उत्तर सुरुवातीला मजेशीर वाटले, पण नंतर मात्र त्याने त्या पाठीमागचे त्याचे असे लॉजिक सांगितले, त्याचे म्हणणे होते की प्रेमाचे सुरुवातीचे दिवस हे अगदी आनंदाचे, मनाला प्रसन्न, प्रफुल्लित करणारे असे असतात आणि म्हणुन ते कुठे तरी साठवुन राहिले पाहिजे म्हणुन तो तेव्हा डायरी लिहीतो. आणि जेव्हा ब्रेक-अप होते किंवा इतर काही कारणांमुळे ती व्यक्ती आपल्यापासुन जेव्हा दुर जाते तेव्हा त्याच आठवणी वाचुन आनंद मिळतो आणि ते दु:ख पचवण्याची ताकद त्यातुन मिळते. त्यामुळे तो लवकरात लवकर सावरुन परत नव्याने उभे राहतो.
त्याचा हा पर्याय अगदी प्रत्येकालाच फार आवडला. पण त्यावर पुढे एक प्रश्न त्याच्यासाठी वाढलेला होता, तो म्हणजे आज पर्यंत किती वेळा अशी डायरी लिहिली आहेस ???
                                                                                                                - कृष्णा खैरे
                                                                                                            
  


No comments:

Post a Comment