Monday 18 July 2016

नेहमीचा फेरफटका

              नेहमी प्रमाणे आज देखील सकाळच्या फेरफटक्यांची सुरूवात झाली, पण आजचे वातावरण काहीसे वेगळे जाणवत होते, खासकरुन आप्पा बळवंत चौकातुन पुढे गेल्यावर ओंकारेश्वर पुलापासुन. सगळीकडे फक्त खाकीच खाकी दिसत होते, हा आता त्यातही खाकीचे दोन प्रकार होते. त्यातील एक खाकी सहसा कधी-कधी दिसते. पण आज माञ त्यांनी त्यांची जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडल्याचे तिथल्या लख्ख स्वच्छतेतुनच दिसत होते. एरवी देखील नाही म्हणायला अशी स्वच्छता असतेच, पण आज मात्र डोळ्यांत भरुन येईल एवढी मात्र नक्कीच जास्त होती.

पुढे बालगंधर्व चौकदेखील मोठमोठ्या गाड्या आणि शाळेतील विद्यार्थीची म्हणजेच हक्काची अशी समजली जाणारी गर्दी दिसली, तेव्हा लहानपणीची आठवण आली आणि वाटले की, आपले नशीब चांगले किंवा मग मिञ थोर त्यामुळे की आमचा गर्दी म्हणून वापरण्यांचा विचार तेव्हा तसा कोणी केला नसेल.

रस्त्यांच्या दोन्ही बाजूला दिसणारी ती गणवेशातील गर्दी, माञ शाळेच्या बाहेर पहिल्या दिवशी असणाऱ्या पालकांच्या गर्दीसारखी भासत होती, कधी-कधी दिसते, दडपण पण आणते, आणि भारीपण वाटते.

नंतर फिरून परत जाताना Ramee Grand Hotel (अजुन ह्या हॉटेल मध्ये जाण्याचा योग तसा आलेला नाही) समोरून जाताना माञ एकदम VVIP असल्याचं फील देऊन गेलं, एवढी शिस्तबद्धता आणि सन्मान आज भेटत होता.

सिंग्नलला थांबलेलो असताना, एक
संवाद ऐकू आला,
आज कोणी तरी येणार आहे वाटत ?
तेव्हा उत्तर ऐकायला आले, कोणीतरी माणुस असेल....

मग आपण कोण ???

~ कृष्णा खैरे ~
१८-जून-२०१६

No comments:

Post a Comment