Monday 28 July 2014

"त्याच्या" बरसण्यातील मजासुखद पावसाळा

                             हल्ली पावसांवर लिहियाला शब्दंच सुचत नाहीत,
                             तसंही त्यालातरी बरसायचं कसं तेच कळत नाही.

पावसाबददल लिहावं तेवढ थोडच वाटत, कारण असंही आजवर खुप जणांनी खुप काही लिहुन ठेवलयं. तरीही लिहिण मात्र संपत नाही, पावसच बरसंन जरी थांबलं तर मनं ओलचिंब भिजायच मात्र विसरत नाही. पाऊस हा सृष्टी ठरलेला मोठं वरदानच आहे, तो सृष्टीला बहरण्य़ापासुन ते फुलण्यापर्यंतचे सगळ सायकल एकटाच जणु काही पुर्ण करतो. पावसाचं बरसण अगदी प्रत्येकालाच मनापासुन आवडत असेलच असं नाही. पण त्याच बरसन पाहुन निसर्ग मात्र नक्कीच प्रफुल्लित होऊन उठतो. आणि त्यांच्याबरोबर आपल्याला सोबत घेऊन जातो.
पाऊस बाहेर वेड्यासारखा बरसतो,

कुठे दूर चातक मात्र आठवणीत तरसतो...

पाऊस कलाकरांसाठी तर मोठी पर्वणीच घेऊन येत असतो. कोणताही कवी किंवा लेखक खास करुन पावसाळा नक्कीच enjoy  करत असतात. किंबहुना ते पावसाळ्याची जास्त मजा घेत असतात. अशावेळी नवीन कल्पना सुचण्यास वेळ लागत नाही, आणि तेच आपल्या शब्दांत उतरवायला तर त्याहुनही सोपे होते.

पावसाळा नेहमीच मनाला सुखवणारा असतोच, आणि त्याबरोबरच अतृप्त जमिनीला देखील तृप्त करणारादेखील असतो जर तो वेळेवर बरसला तर. नाहीतर सुखद, आंनद घेऊन येणारा सोबत खुप काही घेऊन जातो आणि मागे फक्त आठवणीचा निचरा ठेवुन जातो.


   पावसाला काय, त्याला हवं तेव्हा,
  हवं तसा, हवं तिथे  बरसून जातो,
      सोबतीला ढगासोबत वार्‍यालाही घेउन येतो...
                             स्वत: पडुन जातो, वारा मात्र तसाच मागे ठेवतो,                          
                                           अणं शेवटी आठवणीचा मात्र निचरा राहतो...
 
पाऊस प्रत्येकालाच नव्याने प्रेमात पाडतो कधी स्वत:च्या तर कधी दुसर्‍यांच्या. असा पावसाळा तेव्हा मात्र आणखीच सुखद होऊन जातो. अशा पावसाच्या आठवणीने डायरीची सुवर्ण अक्षरांची पाने तशी वाढतच जातात. आणि नवीन कवी, लेखकांचा जन्म सुदधा तेव्हाच घडवतात. 

फक्त मोठया विचारवंता साठीच नाही तर अगदी ट्रेकर्स पासुन ते फोटोग्राफर आणि सह्यवेड्या पासुन (सह्याद्रीवेडे) भटकंती करणार्‍या प्रत्येकालाच वेड लावणारा असा हा पावसाळा असतो. जो सगळ्याना त्यांच्या बरसण्याची आस लावुन असतो.

पाऊसाबरोबर खुप सार्‍या आठवणी असतात, काही मनाला सुखवतात तर काही मात्र आपल्याला स्वत:पासुन दुर नेतात. आणि अशा आठवणी दरवेळी पाऊस आला की ढग दाटुन यावे तसं मनात दाटुन येतात, बाहेर पाऊस कोसळत असतो, अण दुसरीकडे आपण फरक फक्त एवढाच असतो कोसळणारा पाऊस सगळ्यांना दिसत असतो, पण कोलमडलेले मन, अनं कोसळलेला माणुस मात्र दिसत नाही.

पावसाच्या प्रत्येक थेंबात मी त्याला/तिला स्पर्श शोधतa असतो,

तू असशील त्यात  म्हणून मीही भिजुन चिंब होत राहतो...

 पाऊस हा आता कोणाला कितीही आवडला किंवा नाही आवडला तरी तो बरसणारं तर आहेच. मग उगाचच आपण शोक का करावा. म्हणुनच त्याला बरसुन द्यावे आपल्या वाटले की मग आपण भिजावे, नाहीतर गरम भजी आणि चहा घेत त्यांचे बरसणे पहावे. कारण

                                             त्याला बरसताना पाहुन मला आनंद होतो, 
                                      अनं मला आनंद होतो म्हणुनच की काय तो बरसतो.
 
तेही नसेल करायचे तर कोपरा गाठुन पावस किती वाईट म्हणुन त्याला कोसत बसावे. कारण त्याचे काम करतो आपणही आपले काम प्रामणिक पणे करावे. हल्ली तुझ्यावर लिहिताना

शब्दच सापडत नाहीत..
साचून येतात कृष्णमेघ
पण बरसत मात्र नाहीत...
काही राहिले असेल तर बघ...
उगाच नाहीतर साचून राहतील
पावसाविना इथे ढग...

- कृष्णा खैरे 

No comments:

Post a Comment