Saturday 7 June 2014

तु हे नेहमी असंच का बरे करतोस...!!!तु हे नेहमी असंच का बरे करतोस...!!!

तु हे नेहमी असंच करतोस,
माहिती असुनही माहिती नसल्याचं नाटक करतोस

सगळे जाणुन-बुजून माझ्यांकडुनच
ऎकण्याचा प्रयत्नकरतोस
सांग तु हे नेहमी असंच का करतोस ???

वेग-वेगळी नाटके करुन मला हसवतोस,
तु खरचं विसरतोस, की विसरण्याचेही सोंग करतोस
   सांग तु हे नेहमी असंच का करतोस ???

तुला कळत नाही का ?
की मला तु किती आवडतोस ?
तरीही मीच सांगव, असाच अट्टाहास का धरतोस ???
सांग तु हे नेहमी असंच का करतोस ???

मी नाही जगु शकत तुझ्याशिवाय
मग सोडुन गेल्याची स्वप्ने तरी, कशी काय दाखवतोस...
सांग तु हे नेहमी असंच का करतोस ???

सुखाची स्वप्ने पाहताना
तु जगातील दु:खाची जाणीव होऊन देत नाहीस,
सांग तु हे नेहमी असंच का करतोस ???

तुला कितीही विसरायचे म्हटले
तरी तु मला विसरु देत नाहीस
सांग तु हे नेहमी असंच का करतोस ???

तुझ्या आठवणीत रमायचे नाही,
म्हटले तरीही तु ते जमु देत नाहीस,
सांग तु हे नेहमी असंच का करतोस ???

-: कृष्णाई :-

 

No comments:

Post a Comment