Thursday 31 July 2014

औदिल्य अडघळेकर


असं म्हणतात की माणसांची ओळख ही पहिल्यांदा त्यांच्या नावाने आणि नंतर त्यांच्या कामाने म्हणजेच त्यांच्याकडुन करण्यात आलेल्या किंवा झालेल्या करतुतीतुन होते. तसा औदिल्य अडघळेकर नावाने तसा खुप जटील, कठीण आणि अवघड असा जरी वाटत असला तरी प्रत्यक्षात तसा तो अगदीच नव्हता. साधारणपणे आपल्या कडे नाव विचारल्यानंतर हमखास पुढे काही प्रश्न विचारण्यात येतात. जसे की तुम्ही मराठा आहात का की ब्राम्हण की सी.के.पी. वगैरे वगैर बरेच काही. असे प्रश्न व्यक्‍ती आणि अपेक्षित किंवा अनपेक्षित आलेल्या उत्तरानंतर प्रश्न बदलेही जातात. वेळप्रंसंगी मला असे-असे वाटले म्हणुन विचारले अशीही संदर्भासहित स्पष्टीकरण देण्यात येतात. हा आता या सगळ्यामध्ये कोणाला दुखवायचा किंवा हिणवायचा असा कुठेही भाग नसतो, तर तो एक फक्‍त संवाद पुढे नेण्यासाठी केलेला एक साधासुधा उपाय असतो.

तसंच काहीस औदिल्य अडघळेकरच्या बाबतीत ही झाले. नवीनच वर्गात नव्यानेच हजेरी चालु होती म्हणजे आम्ही प्रेझेंटी शीट वर सही करत असताना, स्वत:च नाव बघण्या अगोदर बाकीच्याचीच नाव बघण्यात आणि शोधण्यात जास्त रस होता. आणि तसा तो आम्हांलाच काय प्रत्येकालाच असतो हेही आम्हांला ठाऊक होते. अशीच स्वत:ची कम दुसर्‍यांची नावे शोधत असताना एक भलं मोठ स्पेलिंग दिसलं, की जे दुरुनही स्पष्ट समजे की हे कोणा विदवानाचेच नाव असणार असे. त्यांच्या नावावरुन तर तो अगदी एकतर शांत, आणि हुशार असा कोणीतरी विदवान असेल असेच वाटत होते. lपुढे लेक्चर सुरु झाले आणि एक पंधरा मिनिटांनी दार वाजले. दार वाजल्यानंतर सगळ्याचे लक्ष आपसुकच तिकडे गेले की कोण असेल म्हणुन ? दार उघडण्यात आले तर बाहेर कोणीच नव्हते. सरांचा तसा संताप झाला होता. हीच गोष्ट आणखी दोनदा झाली. एक दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने झाली त्यामुळॆ सरांचा आता रागाचा पारा पार चढुन फुटतो की काय ? याचीच वेळ आली होती. पण आम्ही वर्गात असणारे मात्र या गोष्टीचा मोकळेपणाने आस्वाद घेत होतो. आता लेक्चर संपले होते तरीही सर वर्गात होतेच. आणि परत बाहेरुन दार वाजले, आता म्हटलं बाहेर जो कोणी असेल तो संपला, कारण आता तर लेक्चरसुदधा संपले होते. आणि त्यावेळी समोर दत्त म्हणुन असा औदिल्य उभा होता. त्यांच्यावर पहिल्याच दिवशी जो पाऊस पडला, की बासच. त्याचे काही न ऎकायचे ठरवुनच सर बोलत होते. आणि कसा-बसा तरी त्याचा पहिल्या दिवसाचा ओळखीचा समारंभ त्याचा संपला.


औदिल्य हा पुढे आमच्यात सामील झाला, नावावरुनच अवघड असणारा असा वाटत असला तरी तो एकदम भित्रा म्हण्यापेक्षाही “नो रिस्क” किंवा “सेफ लाइफ” असाच. औदिल्यचा स्वभाव शांत असला तरी त्याची शरीरयष्टी किंवा राहणीमान नक्कीच प्रथम दर्शनी गुंड किंवा भीतीदायक असेच ठरणारे होते. असा अंगाने धिप्पाड असण्याबरोबरीनेच त्यांची हाईटही त्याला साजेशी होती, आणि त्याचे केस हे कधीही कंगव्याचा स्पर्श विरहित असेच आणखी मोठी उंची गाठण्यास त्यास मदतच करत होते. त्याला भेटणारा माणुस हमखास पहिला प्रश्न त्यांच्या अवघड नावाविषयी आणि नंतर दुसरा प्रश्न नक्कीच त्यांच्या केसाविषयी असतो, जसं की हे केस जन्मत:चा असे आहेत की नंतर तुम्ही ते तसे डेव्हलप / मेन्टेन केलेत अशाप्रकारचे.

असा औदिल्य सामील झाल्यापासुन नंतर वेगवेगळ्या पदधतीने आम्हांला खुलत गेलाच आणि नावाने कितीही अवघड आणि दिसण्याला क्रुर असा जरी असला तरी तो इतका भीतीदायक मुळीच नव्हता. त्याच्या बद्दल बर्‍य़ाचदा जोक केला जायचा जर कोणी आपल्याबरोबर पंगा केला तर फक्‍त औदिल्यला पुढे करायचे समोरचे आपोआप घाबरुन निघुन जातील. त्यामुळे औदिल्य कधी बॉडीगार्ड तर कधी नजर न लागण्यासाठी असणारी बाहुली देखील ठरतो. आणि त्याच्यामुळे नक्कीच बाकीचेही तसे आमच्या पासुन लांबच राहणे पसंत करतात. पण या चेष्टा मस्करीचे त्याला कधीही वाईट वाटत नसावे किंवा मित्र म्हणा नाहीतर तो त्याचा स्वभावच नाही. 
 - कृष्णा खैरे

No comments:

Post a Comment