Friday 11 March 2016

लकी चार्म         

Link:- epaper.eprabhat.net/c/9050120

             कॉलेज लाईफमध्ये AT.KT. लागणे हा प्रकार तसा सुरुवातीला जरी नवीन आणि त्रासदायक वाटत असला तरी नंतर मात्र तो कॉलेज लाईफचा फंडाच असल्यासारखा अगदी सहज आणि सोपा बनुन जातो. मग त्यांची सवयदेखील होऊन जाते आणि अगदी काल परवा पर्यंत सहजपणे विचारण्यात येणारा प्रश्न जसा की, किती परसटेंज मिळाले ? तो बदलुन, किती KT लागल्या ? असा होतो. किबंहुना त्यामुळेच की काय सुरुवातीला अगदी ४० जणांनाचा असणारा ग्रुप लास्ट इयरला पोहचेसपर्यंत अगदी बोटांवर मोजण्या इतकीच डोकी उरुन राहिली तीही कशीबशी. पुढे जाऊन या केटीबद्दल वेगवेगळे जोक्स आणि किस्से ही सुरु झाले, आणि AT.KT. ची असणारी भीती निघुन जाऊन, पुढे आपल्याला AT.KT. नाही म्हणजे आपण काहीतरी मोठा गुन्हा केला की काय ? असे आपल्यालाच मनातुन कुठेतरी वाटायला लागायचे किंवा आपण जणु काही त्यांच्यातील भागच नाही असाही आर्विभाव आणला जायचा. 

           अर्थात हे सर्व जरी कितीही खरे असले तरीही फायनल इयरला असताना मात्र चुकीनही AT.KT. लागु नये असाच सर्वांचा मनापासुन प्रामाणिक प्रयत्न असतो, आणि आमचाही अगदी तसाच प्रयत्न होता. मग त्यासाठी प्रत्येकाचा जीव तोडुन अभ्यास चाललेला होता, त्यामुळे पास होण्यासाठी कष्टांची परिसीमा अगदी शिगेला पोहचलेली असतानाच आमच्यातील एका मित्राला मात्र रिफ़्रेशमेण्टची म्हणा किंवा टाइमपास करण्याची बुद्धी काही केल्या शांत बसुन देत नव्हती. आणि त्याने आपले प्रत्यन सुरु केले. त्याने एक किस्सा आठवतो का ? अशा प्रकारे एक गोष्ट सांगण्यास म्हणुन सुरुवात केली, आणि त्याने कॉलेजच्या बाहेर असणार्या रसाच्या गुरळांची आठवण करुन दिली, आणि पुढे त्याने आपल्या स्टाईलने गोष्ट सुरु ठेवली की ज्यामध्ये जास्त कोणाचाही इंटरेस्ट नव्हता, प्रत्येक पेपर च्यावेळी मी बाहेर त्या रसवाल्याकडे रस पितो आणि जेव्हा-जेव्हा त्यांच्याकडे रस पिला ते सगळे पेपर तो पास झाला आणि जेव्हा नाही पिला तेव्हा त्याला KT. लागल्या आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी पिला ते सुध्दा त्या विषयांत पास झाले. सुरुवातीला सर्वांनीच गंमत म्हणुन हसण्यावारी घेतले, पण तरीही प्रत्येकाच्या मनात कुठेतरी शंकेची किंवा भीतीची पाल चुकचुकायला लागली. आणि उगाचच रिस्क नको म्हणत एक-एक करत सगळेच उसाच्या रसाकडे निघाले.

            आता उसाच्या रसाबरोबरच प्रत्येकजण आपले असे स्वत:चे कधीही कुठेही न सांगितलेले पण असलेले असे लकी चॅम्प सांगायला सुरु झाली. तेव्हा आम्हांला समजले की प्रत्येकजण स्वत:च असा आपला काही ना काही तरी लकी चॅम्प फ़ोलो करतोच आहे तेही नकळतपणे, जसे आमच्यातील एकजण पेपरच्या दिवसात रोज एकच शर्ट घालायचा, किंवा कोणी ठराविकच पेन वापरणार, तर कोणी पेपरच्या महिनाभर अगोदरच केस कापणार, पेपरला ठरवुन उशीराच जाणार असे अगदी बरेच किस्से तिथे उलगडले.  अशातच सर्वांच्याच नकळत ही तो उसाचा रसवाला आम्हा सगळ्याचा लकी चॅम्प होत गेला की जी कोणाच्याही लक्षात आले नव्हते. आणि तेव्हा पासुन पुढे रोज पेपर आधी एक आणि पेपरनंतर एक हे नित्यनियमाने ठरुनच गेले आणि त्या वर्षी मात्र एकालाही एकही KT. न लागता सगळेच जण पहिल्यांदा ऑल क्लिअर झाले. का कोणास ठाऊक पण साध्या चेष्टा-मस्करी मध्ये सुरु झालेला उसाचा रस आमच्यासाठी मात्र खराच मोठा लकी चॅम्प ठरला की काय असेच वाटत राहते.......
   
                                                                   - कृष्णा खैरे

No comments:

Post a Comment