Monday 30 May 2016

शब्दांचे हे खेळ सारे
शब्दांचे हे खेळ सारे...


शब्दांचे हे खेळ सारे, शब्दांनीच खेळले सारे

शब्दांनीच सुरुवात झाली, शेवटीही शब्दच राहिले

शब्दांना शब्द भिडले, शब्दांनीच शब्दांचे वाभाडे काढले,

शब्दांचेच शस्त्र झाले, शब्दांनीच विवस्त्र केले

शब्दांनीच वार केले, शब्दांनीच मनही घायाळ केले

शब्दांच्या या लढ्यामध्ये, भावनांचे मात्र कडे कोसळले

भांडण शब्दांचे नव्हतेच मुळी, पण शब्दांना ते समजलेच नाही

अन एरवी जोडणारे शब्द, आता कसे बोचणारे काटे झाले

शेवटी सावरताना मात्र, सारे शब्दच नि:शब्द झाले...


-: कृष्णा :-


No comments:

Post a Comment