Friday 30 December 2016

Unwritten Pages of Diary-2


            बसमधील तिच्याबरोबर झालेल्या पहिल्या अनोळखी भेटीमुळे बर्‍याच गोष्टी बदलत गेल्या. तिने एवढ्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे कशा शेअर केल्या ??? याच गोष्टीचे कुतुहुल काही केल्या स्वस्थ बसु देई ना. तिलाच भेटुन ते विचारावं असं किती जरी वाटत असलं तरी पण आता काही केल्या परत भेट होणारच नव्हती, म्हणुन ते सर्व काही विसरण्य़ातच धन्यता आहे, असे त्याने स्वत:लाच समजावुन घेतले.
        या कवितेचा शेवट काय असावा, ह्या गोष्टीसाठी कित्येक दिवस डोके फ़ोड चाललेली होती, पण त्याचा शेवट काही केल्या सापडत नव्हता. अशाच शेवटांची वाट बघत असताना, कॉलेजमध्ये वेगवेगळ्या फेस्टिवलची रेलचेल सुरु होती. त्यामध्ये कविता सादरीकरण नावाचा प्रकार होता. की ज्यामध्ये कविता सादर करण्याची काही मित्रांना भारीच हौस, कारण तिथुन बर्‍याच जणांच्या तारा जुळल्याच्या कथा होत्या. आणि म्हणुन बर्‍य़ाच जणांचे कविता सादरीकरणासाठी प्रयत्न चालायचे. पण त्यासाठी त्यांना पाहिजे असलेलं खाद्य त्यांच्याकडे नव्हते. त्यांना पाहिजे असलेलं खाद्य शेवटी त्यांना मिळालं, पण तेही एका अटीवर कविता सादर झाल्यावर किंवा होताना कुठेही कोणी लिहिलेली आहे हे कुठेही कोणालाही समजणार नाही, ते फक्त सिक्रेट राहिलं. त्यांच्यासाठी 
कला हे फक्त स्वत:ला express करण्याचं माध्यम असावं, ना की कोणाला impress करण्याचं. 
 पण म्हणुन मित्रांनी त्याचा तसा वापर करावा की नाही हे मात्र त्याने मित्रांवरच सोडुन दिले.
           कविता सादरीकरणाचा दिवस सुरु झाला, वेगवेगळ्या कविता सादर झाल्या. संपुर्ण हॉल भरलेला होता, पुण्यातील बर्‍याच नामवंत कॉलेजमधील विद्यार्थी आलेले होते. कविता सादर होण्यास सुरुवात झाली. आयते खाद्य घेऊन दोन-तीन जणांचे कविता सादरीकरण झाले. आता शेवटची कविता आणि हा अगदी शेवटच्‍या दोन ओळी पर्यंत आला, त्याही त्याने वाचल्या आणि तेवढ्यात समोर बसलेल्या प्रेषकाच्‍या गर्दीतुन मोठा आवाज आला,

हे कसं शक्य, असं कधी होतं का ??? चुकीच आहे हे.....
          पुढे पुर्ण हॉलमध्ये स्मशान शांतता पसरली, काय झाले म्हणुन सगळे इकडे-तिकडे बघु लागले.
स्टेजवर उभ्या असणार्‍या मित्राला तर घामचं फुटला, आणि तो इकडे-तिकडे त्याला शोधु लागला. की आता पुढे काय ?

परत गर्दीतुन आवाज आला, शेवटच्या दोन ओळी चुकीच्या आहेत, असं कधी होतं का ??? 

          हे ऎकुन, तो बसल्या जागेवरुन ताडकन उभा राहिला, कोण आहे ? ते पाहण्यासाठी. की जी पुर्ण गर्दीने भरलेल्या हॉलमध्ये अगदी बिनधास्तपणे एखाद्या कवितेवर आक्षेप घेऊ शकते. 
         तोपर्यंत स्टेजवरच्या कविता सादर करणार्‍या त्या मित्रांच घामाने पाणी-पाणी झालं होतं, घसा कोरडा पडला होता. आणि कावर्‍या-बावर्‍या नजरेने. एक नजर त्यांच्यावर, अरे वाचवं आता ह्यातुन.... काय लिहुन ठेवलंय असं म्हणत होती. तर त्यांच्या दुसर्‍याच क्षणी हातात असलेला माईक त्या प्रश्न विचारणार्‍या मुलींच्या दिशेने फेकावा की काय अशी त्यांची द्यनीय अवस्था झालेली.
          आता काय करावे आणि काय हे कोणालाच सुचत नव्हते. संपुर्ण हॉलमध्ये फक्‍त तीनच व्यक्ती उभ्या होत्‍या. एक स्टेजवर कविता सादर करणारा मित्र, एक कविता लिहणारा तो, आणि तिसरी त्यावर आक्षेप घेणारी ती. ही शांतता काही करुन संपवायची होती, नाहीतर स्टेजवरचा मित्र जागच्‍या-जागी हार्ट अ‍ॅटकने संपला असता.
          पण शेवटी तो कॉलेजचाच हॉल आणि आपला मित्र अडचणी सापडला आहे म्हटल्यावर, बाकीचे मित्र कसे काय शांत राहतील ? आणि पुढे सुरु झालेल्या गोधंळामुळे हा सुखरुप स्टेजवरुन खाली आला, पण तो स्टेजवरुन उतरताना त्यांच्या नजरेत दिसत असणारे विचित्र भाव यावरुन ऎवढे समजत होते की, आता माझे काही खरे नाही...
आणि दुसर्‍याच क्षणी त्याला क्लिक झाले की, ती प्रश्न विचारणारी मुलगी म्हणजे तीच मुलगी जी बस मध्ये भेटली होती. पुढच्याच क्षणी विचार आला की, हिला भेटावे का ?
परत वाटले की  ही ती नसेल तर.
बरं असली तरी पण मग काय तेव्हा ?
पण ही जर तीच, तर ती इथे कशी काय ?
बर ही तीच असेल तर, मग ती ओळखेलच ना....
आणि आपण बोललो आणि ती बोललीच  नाही तर....
नाहीतर तु कोण असंच म्हटली तर ?
          परत वाटले तिने ओळखंल तर ती येऊन बोलेल. पण परत वाटले, प्रश्न तर आपल्याच मनात आहेत, उत्तरही आपल्याच पाहिजेत. मग भेटायला हरकत काय ? पण परत विचार आला की, कोणता प्रश्न विचारणार नाही म्हणुन तेव्हा तिने ते सर्व शेअर केलं होतं. परत तेच त्यापेक्षा नकोच.
मग ही परत कधी भेटलीच नाही तर... कारण ती या कॉलेजची वाटत नव्हती.
          ह्या सगळ्याचा विचार चालु असतानाच स्टेजवरुन खाली येणारा मित्र (जणु काही साऊथ मधला विलन) आणि दुसर्‍या बाजुने तीही आता इकडेच निघाली. आता खरी अडचण निर्माण झाली, तिने ओळखले म्हणुन ती भेटायला, बोलायला येतेय की काय आणखी वेगळं काय ?
तिच्याशी बोलण्यासाठी इथेच थांबलं तर समोरुन येणारा हा आपल्याला काही सोडणारं नाहीये. अशावेळी तिला परत कधीही भेटता येईल, पण तुर्तास आपली साईड बॅग घेऊन पळण्यातच धन्यता होती.
बाकीच्या कोणाला काही समजण्याच्या आता तिथुन गायब. कविता वाचणारा मित्र त्या जागेवर येऊन शोधु लागला, कुठे गायब झाला म्हणुन आणि तेवढ्यात तीही तिथे आली, आणि तिने त्याला परत तोच प्रश्न विचारला, तु असं कसं काय लिहु शकतोस ?
ह्याचा रागीट चेहरा आता परत केविलवाणा झाला, इकडे- तिकडे काही तरी खाली मान घालुन तो शोधु लागला आणि त्याने पळ काढायचा प्रयत्‍न सुरु केला. मग त्याने एक-दोन मित्रांना आवाज देऊन ह्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग काहीच नव्हता. आता तोपर्यंत बाकीचेही मित्र-मैत्रीण गोळा व्हायला सुरुवात झाली, आणि त्यांच्या जीवात जीवसुद्धा.

        स्टेजवरच्‍या दुसर्‍या विगेंतुन ही सगळी मजा अनुभवत होतो खरा, पण ते भाग्य फार काळ टिकलं नाही. आणि कोणीतरी आवाज दिला,अरे स्टेजवर काय करताय अजुन ? चला निघायचेय....
हे ऎकताच, तिथुन सुद्धा पळ काढावा लागला.

पण काही केल्या ती त्याला काही त्या कवितेच्या शेवटांविषयी सोडत नव्हती, आणि त्याला कवी मित्र मात्र यातुन वाचवण्यासाठी काही केल्या सापडत नव्हता. 
 
ती कविता आपण का सादर केली ? ह्या साठी हा आता स्वत:लाच कोसत होता.
त्याला वाटत होते की तिला खरं सांगुन टाकावं,  की ही कविता त्याची नाही पणं.......

8 comments:

 1. आयुष्यांत बरेच जण भेटतात...

  आयुष्यांत बरेचजण भेटतात,
  आणि, आयुष्यांत बरेचजण सुटतात.

  भेटणाऱ्यांना भेटत गेल्याने,
  न सुटणारे सुटत जातात

  भेटणारे भेटुन द्या की,
  पण म्हणुन सुटणाऱ्यांना सोडुन कसे चालेल ?
  कारण, तेही कधीतरी असेच भेटलेले असतात.

  मग पुन्हा मोठा प्रश्न पडतो,
  की भेटणाऱ्यांना भेटत जायचे ?
  की सुटणाऱ्यांना सोडत जायचे?

  आणि मग, मन उत्तर शोधायला लागते,
  पण उत्तर काही सापडत नाही,
  आणि सापडलेच तर ठरत नाही,
  ठरलेच तर तसे घडत नाही
  आणि, घडलेच तरी ते परत मन मानत नाही.

  अशात, भेटणारे तर भेटतंच नाहीत
  आणि, सुटणारेही सोडवत नाहीत…
  मग, यासगळ्यांत कोणीतरी भेटावे,
  आणि सांगावे, ’जुने तेचं सोने’

  आपणही पुन्हा सुटणाऱ्यांच्या मागे धावावे,
  आणि त्यांनी पुढेच पळावे…
  आपण निराश होऊन परत फिरावे,

  आणि त्याने हळुच पुढे येऊन वाट पहावे….
  आणं सांगावे, “ मी तुझ्याचसाठी वेडी आहे रे,,,”
  - कृष्णाई -

  ReplyDelete
 2. धन्यवाद महेश बाबू

  ReplyDelete
 3. पुढे काय ???
  कधी समजणार...

  ReplyDelete