Monday 14 July 2014

एक रम्य संध्याकाळ
कॉलेज हे फक्‍त सुरुवातीच्या काही दिवस म्हणुन कॉलेज असतं आणि थोड्याच दिवसांनी म्हणजे मित्र-मैत्रिण चांगले जमल्यानंतर ग्रुपस तयार होतात. आणि मग आपण घरापेक्षा जास्त वेळ तिथेच असतो. त्यातही कॉलेजमधील मित्र जर हॉस्टेलवर राहणारे किंवा त्यांच्या रुम्स कॉलेजच्या कॅम्पस मध्ये असतील हमखासच सगळेजण तिथेच पडिक असतात. आपल्याकडे सगळ्याचेच कॉलेज हे सकाळी किंवा दुपारी असते त्यामुळे तसा संध्याकाळपर्यंत कॉलेजवर थांबण्याचा असा कधी प्रसंग किंवा तशी संध्याकाळची कॉलेजवरील वेळ फारशी कोणी लवकर अनुभवत नाही. त्यामुळे दिवसभर गर्दीने आणि माणसांनी भरलेले हे कॉलेज संध्याकाळी कसे असते ? कसे दिसते ? हे तसे फारसे सर्वांसोबत कोणी अनुभवलेले नसते.

पण आमच्या बाबतीत तेच घडते जे सामान्यपणे सामान्य लोकांच्या बाबतीत घडत नाही, किंवा आम्ही तसे घडवुन आणतो अशा यापैंकी काहीही एक. होस्टेलवर राहणारे मित्र असल्यामुळे कॉलेज कधीही आणि कितीही वाजता संपले तरी आम्ही कॉलेजवरच असायचो. तसे आमचे कॉलेज दुपारी ३, ४, ५ असेही कधीही संपायचे. तिथु पुढे बोर झाले की होस्टेलवर जाऊन आराम करायचा. आणि मग पुढे संध्याकाळ झाली की, कॅम्पस मध्ये फिरणे, मैदान तील हिरवळीतुन चालत्त असताना हिरवळदेखील बघणे, कॅफेमध्ये बसणे, कट्ट्यावर बसुन टगेगिरी करणे, होस्टेल समोर बसुन टाइमपास करणे, जोक्सच्या नावाखाली उगीचच हसणे आणि एखाद्‍यावर हसत बसणे अशा सगळ्या गोष्टी करणे म्हणजे रोजची संध्याकाळ रम्य करणे.

या सगळ्या प्लॅनिग मध्ये कधी नाटकं, गाणी किंवा प्रोजेक्टस आणि एक्झाम आली तरी फारसा असा बदल होत नसायचा, कारण ही रोजची सवय झालेली असायची ती कशी काय बदलणार. या सगळ्या मुळे बर्‍याच ठिकाणी आमचे खुप सारे असे आवडीचे कट्टे आणि ठिकाणे झालेली आहेत. की जिथे बसुन दिवसभराचा थकवा, टेन्शन दुर व्हायचे. असाच एक कट्टा अगदी थ्री इडियटस मधल्या असणार्‍या पाण्याच्या टाकीसारखा की जिथे आम्ही रोज बसतो. एकदा ठरवले की, सगळ्या मित्र-मैत्रिणांना घेऊन एकदा तरी इथे बसायचे.

हा कट्टा अशा ठिकाणी आहे, की जिथुन संपुर्ण पुणे एका नजरेत दिसते, आणि त्याचवेळी दुसर्‍या बाजुला सिंहगड किल्ला त्याबरोबरीने धरणातले वाहणारे पाणी दिसते. अगदी शांत असे हे ठिकाणी जिथे संध्याकाळी कॉलेज असुनही तसे फारसे कोणी फिरकत नाही. तिथे नेहमीच थंडगार अशी हवा वाहत असते की जी अंगाला बोचरी नसते, पण अल्हद पणे अंगाला स्पर्श करुन जाताना मनात हळुवारपणे एक वलय निर्माण करुन जाते. आणि नकळत तिथे असणारी शांतता आपल्याशी खुप काही बोलु लागते. आपल्यालाच आपली आणखी नव्याने अशी ओळख करुन देत राहते. आपल्याबरोबर सजीव माणसापेक्षा देखील निसर्गातील देखील कोणी बोलु शकते हे तिथे बसल्यापासुन समजु लागले. अशा या कट्ट्यावर आम्ही आमच्या सगळ्या मित्रमंडळीना एकदा घेऊन आलोच. आम्ही येत असताना सुर्य मात्र अस्ताला चालला होता, तसा तो अस्ताला रोजच जातो पण आज तो त्याच्याबरोबर आमच्याबरोबरील बरंच काही घेऊन जात होता.

 येताना प्रत्येकाचा मुड तसा चांगलाच होता म्हणजेच अगदी आनंदात. तिथे जाऊन बसलो आणि सगळ्यानीच ठरवले की २ मिनिटे कोणीच काही बोलायचे नाही. आणि कधीही न शांत बसणारे ते आज सगळे शांत बसले. तेव्हा अनुभवलेली अजान शांतता नंतर नकोशी झाली कारण त्या दोनच मिनिटांनी संपुर्ण कॉलेजलाइफ फ्लॅशबॅक झाल्या सारखे समोरुन चमकुन गेले, प्रत्येक अन प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे दिसत होती. शेवटी न राहवुन आम्हीच ती शांतता भंग केली आणि त्या दोन मिनिटांत केलेला दोन वर्षांचा प्रवास तुथेच थांबला. प्रत्येक जण अगदी कधीही न वाटणारा इथे इमोशनल झाला होता. आता प्रत्येकानेच आपल्या स्वत:बददल आणि दुसर्‍य़ाबद्दल वाटणार सगळं काही अस शेअर करण्य़ास सुरुवात केली. मग ते कॉलेजमधले किस्से असतील किंवा कुंटुबाबरोबरचे सर्वच काही. ग्रुप असणारी छोटी छोटी झालेली भांडणे त्याही पेक्षा योग्य शब्द म्हणजे वाद-विवाद आज स्वत:हुन चुक मान्य करुन मनधरणी करायला सुरुवात झाली.

कुणी स्वत:च पहिले प्रेम तर कोणी आपली मनातील आवड असं सगळंच सांगितले. एरवी आम्ही नेहमीच या ना त्या विषयावर गप्पा मारत असतो पण आज काही वेगळेच वळण आणि एक निराळी उंची आज गाठलेली होती. अगदी थिल्लरपणा करणारा एखादा देखील इतका इमोशनल असुन शकतो हे आज पुन्हा एकदा बर्‍य़ाच जणाना आमच्याबाबतीत समजले. शेवटी या सगळ्यात अनोख्या ठिकाणी जमलेल्या गट्टीवर शेवटी दोन समांतर काट्याचा पुर्णविराम लावावाच लागतो ६.३० सुरु झालेला हा प्रवास समातंर ते वरुन कधी भिन्न टोकाकडे गेला आणि समातंर असणारे देखील ९०अंशात फिरले हे कळे पर्यत १० चे १०( १०वाजुन १०मि) वाजले होते. वेळ संपली आणि आता हा शेवटी संध्याकाळ म्हटणारा कट्टादेखील संपला होता. कारण हा तसा आजपुरता शेवटचाच दिवस होता आणि रम्य ठरणार्‍या आठवणीतील स्पष्ट पणे दिसणारी अंधुक अशी पहिलीच संध्याकाळ....
कृष्णा खैरे

         

No comments:

Post a Comment