2nd Home, पुण्यात स्वत:च आणि हक्काचं असं
आपलं घरं असण्याचं आई–बाबाचं स्वप्नं आता सत्यात उतरलं, आणि पुण्यात दुसरं घरं
पुर्ण झालं.
पार्किंगला जागा किती सोडायची; किचनला टाईल्स बसवायच्या की
फर्निचर; फरशी कोणती बसवायची; गॅलरी असावी की नको; बरं आता, रंग कोणता द्यायचा;
गेट लोंखडी लावायचे की अजुन वेगळे काही, झाडांना जागा किती ठेवायची, बरं झाडे
कोणती लावायची ? असे एक-ना अनेक प्रश्न गेले भरपुर दिवस सर्वांच्याच डोक्यात घर
करुन होते. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत आता पुण्यातले स्वतंचे आणि हक्काचे
असे 2nd
Home तयार झाले.
तसे पाहता हे 2nd Home दोन-तीन वर्षांपुर्वीच झालेदेखील
असते. जर पुण्यातल्या मध्यवर्ती भागातले घर विकले असते तर....पण हे घर विकण्याची
नक्कीच कोणाचाही मुळीच इच्छा नव्हती; कारण हे घर फक्त घर नसुन त्यापेक्षाही वेगळ असं
खुप जास्त काहीसं आहे.
आणि असंही आपलं अस्तित्व संपवुन स्वप्न पुर्ण करण्यात
कसली आलीये मजा...
हे घर म्हणजे माझं स्वत:च आणि कुंटुंबाच आजवरचं असलेल जणु अस्तिवचं. कारण या घरांत आमच्या सगळ्या भांवडाचं बालपणं गेल, शिक्षणंही झालं. शिक्षण होत असताना दहा ते बारा वर्षांनी शाळा बदलली, तेव्हा दहावीच्या रिझल्टनंतर साजरा केलेला आनंद, आणि त्याचवेळी पुढे काय करायचे? ह्या कठीण प्रश्नाचे सोडवत बसलेले उत्तर तेही इथेच.
नंतर कॉलेजला गेलो, आणि मग परत बदलत्या कॉलेजांबरोबर तसे मित्रमैत्रिणी आणि सारेच जग बदलत गेले.
सुरुवातीला शाळेत चालत जात असे, नंतर सायकलने, परत दुसरी सायकल मग गियरची सायकल अशी बदलत गेली, आणि पुढे गाडी आली. पण या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र अशी कायम आणि न बदलेली होती, ती म्हणजे हे घर.
कॉलेजला असताना रात्रभर जागुन केलेला अभ्यास, प्रेझेटेशन्स, प्रोजेक्टस अगदी सगळचं, जिथे केले ती स्पेशल स्वत:ची स्पेस म्हणजे घरातील आपली अशी विशिष्ट स्वत:ची
हक्कांची खास जागा, तिथेच बसुन दरवर्षी केलेले आणि भिंतीला चिटकवुन ठेवलेले नव-नवीन संकल्प. तिथेच बसुन लिहीत असलेला हा ब्लॉग. सारं-सारं अगदी फ्लॅशबॅक सारखं सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करत नजरे समोरुन जात आहे.
वाढदिवसादिवशी येणार्या खास मित्रांची होणारी गर्दी, गौरी-गणपती मध्ये सजावटीसाठी चालणारी धडपड, गणपतीची सजावट खास माझ्या आवडीची तर गौरींची सजावट हा बाकीच्यांचा विषय हेही ठरलेले. गणपती बघण्यासाठी म्हणुन येणारे पाहुणे. आणि घरजवळच असल्यामुळे मिरवणुकेमध्ये घालवलेले २४ तास, हे शक्य होत ते फक्त आणि फक्त ह्या घरांमुळे.
दिवाळीला फराळाचे नवनवीन पदार्थ शिकणे, सारसबागेतील पाडव्याची दिवाळी पहाट आणि त्यानंतर दिवाळीच्या फराळांसाठी घरी येणारी मित्रमंडळी-नातेवाईक. उन्हाळयात टेरेसवर पतंग उडवताना झालेले वेगवेगळे पंगे, रात्री रंगलेले कॅरम, साप-शिडी असे वेगवेगळ्या खेळांचे डाव, लाईट गेल्यावर अंधारात सावल्यांशी खेळणं, जिन्यावरुन पडणं, खेळताना भिंतीवर डोकं आपटणं, पावसात मनसोक्त भिजणं आणि चांदण्याच्या चादरीखाली झोपणे.
घरांपासुन लांब बर्याचदा राहिलो अगदी आठ-आठ दिवस सुध्दा कॉलेजला असताना होस्टेलवर किंवा फिरायला गेल्यावर, कधी शिबिरांमध्ये, तर कधी ट्रिपला. पण तेव्हा फिरुन-फिरुन शेवटी याच घरी जायचं हे नक्की होतं.
पुण्याच्या बाहेरुन म्हणजे अगदी कुठूनही पुण्यात कधीही आणि कितीही वाजता येण्याची हिंम्मत याच घरांमुळे मिळायची. कारण इथे असलेली वाहतुकीची कनेक्टीव्हिटी, ज्यामुळे कधीही सुरक्षित घरी पोहण्याची हमी होती. त्यामुळे कित्येकदा रात्री बारा, दोन तर कधी पहाटे चार-पाच वाजता सुदधा प्रवासांवरुन घरी परत यायचो किंवा जायचो सुदधा.
या सोयीमुळे किंवा पुण्यात मध्यवर्ती भागात असल्यामुळे बर्याच मित्रांसाठी हे घर म्हणजे सोयीचा आणि आवडीचा असा टाइमपास साठी असलेला स्पॉटदेखील.
या घरांत आई-वडीलांनी संसाराची सुरुवात केलेली. त्याहीपेक्षा जास्त म्हणजे पुण्यात आल्यानंतर वडीलांचं पहिलं घरं किंवा पहिला आसरा तो हाच. त्यामुळे आमच्या सगळ्यांपेक्षा त्यांच्यासाठी ह्यां सगळ्या आठवणी काही औरच. या सगळ्या प्रवासात सोबत असुनही कधी साधी जाणीव देखील ज्याची झाली नाही, कदाचित आज लांब जाण्याच्या वेळी मात्र स्तब्धपणे आठवणी आठवुन देत आहे. आजही तसेच भक्कम, निरागस आणि शांतपणे उभे राहुन…..
पण आता या सगळ्या आठवणी सोबत घेऊन, 2nd Home मध्ये जाण्याची वेळ झालेली आहे. एखाद्या मुलीला लग्न करुन
सासरी जाताना काय वाटत असेल त्या गोष्टीची कल्पना आता येते. आजवर ज्या घरांत आपण राहिलो, लहानाचे
मोठे झालो, ते सगळं सोडुन जाताना आपण तिथल्या फक्त आणि फक्त आठवणीचं नेवु शकतो. त्यामुळे
माहेर कितीही गोड असले तरीही पुढच्या आयुष्यातील आनंदाच्या ओढीने तिला सासरी जावेच
लागते. अगदी त्याचप्रमाणे आता इथुन निघताना थोडेस अवघडल्यासारखे किंवा अगदी Emotional असं वाटतं आहे. पण
पुरुषांनी जास्त Emotional असु नये
असं म्हटलं जातं, तसा मीही कधी Emotional वगैरे होत नाही किंवा या प्रकारांतील प्राणी मुळीच नाही, पण
तरीही कधी कधी स्वत:ला सावरताना होत असं कधी-कधी....कारण नंतर काही वर्षानी हे
सर्व असेच राहिलं किंवा नाही सांगता येत नाही पण आता परत इथे राहणेही होणार नाही
एवढे मात्र नक्की....
तरीही
आयुष्यात पहिलेले एक मोठे स्वप्न पुर्ण होतयं यांचा आनंद होतोयं आणि त्याचंच
समाधानही आहे.
Nice... Its all about attachment :D mag te ghar aso kiwa mansa...
ReplyDeleteit's True....
DeleteNice bro
ReplyDeleteNice bro
ReplyDeleteThank you Santosh.....
ReplyDeleteGreat going nana💐👍
ReplyDeleteThank you Bro.
ReplyDelete