तुझं माझं नातं
तुझं-माझं नातं जरासं वेगळं असं,
न भेटताही जुळलेलं सारं जसं
वेळ लागला होता एकमेकांना
ओळखायला
पण समजत गेल पुढे सारं क्षणा-क्षणाला,
तुझे नुसते शब्दचं करतात जादु, जणुकाही
बनुन कविता
आणि अगदी फिल्मी वाटणारे गाणेही
ऎकायला लावतात मला
तुझं माझं बोलण होत असे, तसं
आकस्मितच
आणि आपलं भेटणं, अजुनही आहे तसं भाकितचं
तुझा अबोला नकळत खुप काही बोलुन
जाई
न सांगताही उगाच मनात प्रश्न
दाटुन येई,
नक्कीच नाही जमणार असं कधी-कधी
वाटतं
अनं तेव्हा तुझं रुसणं,फुगणं
सुदधा हव-हवंस वाटतं,
नात्यांची या गोडी तुझ्यामुळेच
कळली,
तुझ्यासोबतच आता पुढची आता वाट
ठरलेली....
No comments:
Post a Comment