Tuesday 6 February 2018

फेसबुक मार्कटप्लेस

             
 

 For Details follow Link:- epaper.eprabhat.net//c/26036888
          
               ऑनलाईन शॉपिंगमध्ये दिवसेंदिवस होत जाणारी वाढ लक्षात घेत फेसबुकने सुदधा आता पुढे सरसावत फेसबुकवर Marketplace नावाने आपले नवीन फ़िचर्स आता भारतातदेखील सुरु केले आहे. या Marketplace मध्ये इलेक्ट्रॉनिक्स, मंनोरंजन, गृहनिर्माण, वाहने, सौंदर्यप्रसाधने, ज्वेलरी, पुस्तके याबरोबरीनेच इतरही वस्तुंची खरेदी-विक्री आपण करु शकतो. यामध्ये आपण किमंत आणि आपल्यांपासुन असलेले अंतर यासारख्या फिल्टरचा वापर करु शकतो.

              विक्रेते, उत्पाद, किंमत, श्रेणी, स्थान आणि संबंधित प्रतिमा यासारखी माहितीची यावर नोंदणी करू शकतात. खरेदीदारांना उत्पादन स्थिती, वापराचे पॅटर्न आणि खरेदीचे वेळ यासारखी तपशील पाहता येतो. त्यामुळे आपल्याला आवडलेली एखादी वस्तु आपण लगेच कॉन्टॅक्ट करुन घेऊ शकतो.

              यावर आपण आपल्या  वापरलेल्या देखील विकु शकतो. त्याबरोबरीनेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाडे करार, इव्हेंट मॅनेजमेंट, आर्किटेक्चर आणि ज्योतिषशास्त्रावर उपलब्ध असलेल्या निवासी मालमत्तेसारखी सेवा देखील देते. त्यात क्लासीफाइड विभागही आहे.

              इतर ऑनलाईन मार्केटप्रमाणे इथे देखील काही फसव्या ऑफर्स दाखवल्या जात आहे, जसे की अगदी १ रु. मध्ये एखादी कार, फ़्लॅट वगैरे की, ज्या खर्‍या किंमतीशी विसंगत आहेत.

               फेसबुक मार्केटप्लेस मुळे घरगुती किंवा लहान उद्योगांना ऑनलाईन मार्केटचा मोठा फायदा होऊ शकतो. कारण घरगुती वस्तु, ज्वेलरी आणि इलेक्ट्रॉनिक्स हे भारतातील ऑनलाईन मार्केटमधील सर्वांत मोठा हिस्सा आहे. यामध्ये आपण सहजपणे आपले प्रोडेक्ट विकु शकता, यासाठी फक्त आपल्या प्रोडक्टचे फोटो आणि त्यांची माहिती देऊन पोस्ट सबमिट करायची, आणि जो कोणी घेणारा असेल तो आपल्याला त्यावरुन संपर्क करु शकतो.

कृष्णा खैरे

No comments:

Post a Comment