तुझ्या बरोबर नेहमीच बोलणं होत असतं, आणि ते
कधीच संपु नये असंही अगदी मनापासुन वाटत असतं.
आपण बसमध्ये अनोळखी असल्यांसारखेच
भेटलेले असताना, चार तासांच्या ओळखीमध्ये तू मनातील सर्व बोलून दाखवलं, कारण तेव्हा तर तुझ्यासाठी मी अनोळखी होतो, म्हणुन
ह्यांच्या पासुन आपल्याला काहीचं नुकसान होणार नाही किंवा हा कोणा आपल्या
नातेवाईकांना काहीच सांगणार नाही, याच भरवश्यांवर. तेव्हा मला समजले इतरांसारखे स्वत:शीच बोलत बसणे ना कधी तुला आवडले न तसे कधी जमले. मनाने जिंवत असणार्या माणसांसोबत कदाचित
मन मोकळं करायला तुला आवडतं, हे तु तेव्हा
सांगितलंस. आणि कोणतंही वचन न घेता तसंच सारं सोडुन
दिलंस, कारण तेव्हा तुला फक्त sharing हवं होतं caring नको. आणि अर्थांतच कोणतही नातं नसल्यामुळे तेव्हा ते शक्य होतं. दिवसं संपला, सगळं संपलं, परत भेटणं होणार नाही हेही माहिती होत.
तिच्या मनातलं ती सगळं share करुन गेली, पण माझ्या मनात प्रश्नांचे काहुर माजवुन
गेली. सर्व काही अनुत्तरीत अगदी शुन्यच, बैचेन करणारं,
अशातच मन आणि बुध्दीतील तांडव सुरु झालं. तेव्हा बुध्दीचा विजय झाला
असं म्हणता येणार नाही, पण परिस्थितीने उत्तर शोधायला मुभा
दिली नाही आणि नवीन व्यवहांराची प्रश्नपत्रिका दिली. तरीही तिच्या त्या sharing च ओझं मात्र मी मात्र वागवत होतो.
परत कशी माहीत
नाही, पण आपली भेट झाली. तुला खुप दिवसांपासुन एक गोष्ट
तुला खुप
दिवसांपासुन एक गोष्ट सांगायची होती, परत तिनेच केली नवीन सुरुवात. माझं या
सर्वांत कुठेच काहीच नव्हतं, फक्त शांतपणे ऎकणंच सुरु होतं, कदाचित तिलाही तेच हवं होत. कोणीतरी तिचं ऎकणारं,
काहीही न बोलता फक्त ऎकणारं. पुन्हा फक्त sharing, but don’t want
caring.
कारण अगदी सरळ होतं जेव्हा नातं येतं, तेव्हा आपसुकचं काळजी येते, सोबत मग जबाबदारी, आणि मग जबाबदारी सोबत येणार्या अगणित अपेक्षा. परत त्या पुर्ण झाल्या नाहीत म्हणुन त्याचं ओझं होतं त्यातुन पुन्हा होणारा तोच-तोच मन:स्ताप.
पण हे सर्व वेगळं होतं, ह्याला काहीच नाव नव्हतं,
बंधन नव्हतं, ना अपेक्षाचं ओझं. फक्त पाया
होता. तोही एवढाचं की, जेव्हा केव्हा सगळं संपलंय किंवा
काहीच समजतं नाही, दुनियाची ऎसी की तैसी म्हणण्याची वेळ येईल
तेव्हा भेटायचं, सगळी भडासं बोलुन ओकुन टाकायची, हयात काय चुक/ काय बरोबर/ असं करायला पाहिजे/ असं नाही यापैकी काहीच नाही.
फक्त बोलुन मोकळ व्हायचं एवढंच. मग ह्या भेटण्याला ठराविकच वेळ, काळ, बंधन असं काही नाही. Phone वर कधी बोलायचं नाही, फक्त
भेटण्य़ाचं साधन एवढाच काय तो त्याचा उपयोग. नंतर chatting, message हे प्रकार उद्यास आले त्यावर तर अजिबातच नाही बोलायचं, कारण तिथेच खरा संवाद
संपतो, किबंहुना त्यामुळे हल्ली जास्त प्रश्न वाढत चाललेत,
असं प्रामाणिक दोघाचंही एकमत झालेलं.
माझं कमी बोलणं, अगदी काही भेटीतचं तिने हेरलं. आणि त्यांच्यावर उपाय देखील तिला सुचला. तेव्हा ती लटकं रागवायची, माझ्याशी भांडायची, गप्पा मारायची.
मनातलं गुपितं फोडायची, त्तेव्हा तिलाच माझं कविता करण्याचं
गुपितं पहिल्यांदा उलघडलं आणि त्याला उत्सफुर्त दाद तीच द्यायची. किंबहुना तिच्या sharing, मुळेच त्या सर्व process ला सुरुवात झाली असावी. एरवी दिवसभर चालणारे कॉलेज, करियरचे टेन्शन, अभ्यासांची काळजी, sports, cultural
activity, पुढे परत ९ ते ६ जॉब, घरांची जबाबदारी
ह्यासगळ्यांपेक्षा सुदधा एक वेगळं आयुष्यं असतं ह्याची आजपर्यंत प्रत्येक-प्रत्येक
वेळी जाणीव तिने करुन दिली. त्याला कोणी personal space म्हणत किंवा आणखी वेगळं काही.
“ आज काही नवीन नाही का म्हणत ? “ म्हणत नव-नवीन
लिहण्यास ती भाग पाडत गेली.
“ कला वाया जाऊन देऊ नकोस, कारण शेवटी फक्त तीच
सोबत राहील बाकी सर्वच काही वेळ आल्यावर सोडुन जाईल.”
तेव्हा तिला विचारले, हे शब्दांचे खेळ जीवघेणे
ठरतात.
“शब्दांशी खेळणार्य़ाने भावनांशी खेळु नये, किंवा त्यांना तसे भावनांशी खेळता येत नाही”,
पण म्हणुन शब्दांचे खेळ करणे थांबवु नकोस, कोणाला त्यांच्या भावना तुझ्या शब्दांत सापडल्याच, तर तो खेळ हा शब्द समजुन घेणार्याने त्यांच्या भावनांशी केलेला असेल, तेव्हा त्यात चुक तुझी नक्कीच नसेल. हे सर्व तिने अगदी सुरुवातीलाच सांगितले होते.
कधी कोणाबद्दल तिला सांगितलं तर ती
हिच्या-तिच्या नावावरुन ती चिडवायची. तेव्हा गालातल्या गालात न राहवुन हसवायची पण
तेव्हा मनात वेगळीच काळजी सुरु व्हायची.
तिलासुदधा तिच्या भावी जोडीदाराने
तिच्यांसाठी तिच्यावर एक छोटीशी का होईना कविता करावी, अशी तिची स्वप्नवत ईच्छा
तिने बोलुन दाखविली होती. तेव्हा स्वत:कडे मोठया फुशारकीने बघत विचारले, इन जनाब के बारे मैं आपका क्या ख्याल है ?
हा प्रश्न म्हणजे फक्त विनोदाचाच एक भाग
होता.
आणि तेव्हा तिनेही तसेच मजेशीर उत्तर दिले, two same pole of magnet never meets each other.
अगदी साधा नियम होता magnetism चा. पण त्या पाठीमागे असलेला सारासार अर्थ तेव्हा समजला. Science चे law of attraction पासुन law of repulsion ते अगदी Chemistry, Physics आणि nature of life सगळेच कसे reverse action मध्ये तेव्हा समजले गेले, तेही विथ लॉजिक.
तोवर वाचलेली सर्व पुस्तक, कांदबरी, साहित्य, कविता यांसगळ्याचा अर्थ आता कुठे उमजायला लागला होता. आत्तापर्यंत बरेच काही वाचलं होतं, पण या सर्वांची खर्या आयुष्यांशी सांगड कधी घालताच आली नाही. मग ती कितीही लेख, कांदबर्या, कविता वाचुन त्यांची अनुभुती आलीच नव्हती. पण art of life
म्हणजे काय हे तिच्या कडुन
प्रत्यक्षात उमगलं. बुध्दीमत्तेचा उत्तम दर्जा, आयुष्याला समजुन घेण्याची तिची कला पाहुन
तेव्हा नवल वाटले. आणि खर्या अर्थाने maturity of psychology ह्या तिच्या डिक्शनरीतील शब्द तिथे मला प्रदान केला.
आम्ही बेफिकीर, बिनधास्त होतो नेह्मीच, पण बेपर्वा नव्हतो. लहरीपणा होता, मस्ती होती, वाटेल तेव्हा गाडीवर मोठ्याने १९८० ची गाणी म्हणत नाहीतर ओरडत, किंचाळत फिरायचे.
to be continued...
आता miss करतोय, ते Sharing जे असेल without caring, बिनधास्त, बेफ़िकीर.
तशीच निखळ मैत्री, फक्त मैत्री.
Because Every Guy needs Girl Best friend.
Good one
ReplyDeleteDhanyawad @Santosh Kachare
ReplyDeleteअप्रतिम मित्रा.... फारच छान👍👍
ReplyDeleteधन्यवाद मित्रा...
Deleteथन्यवाद शंकर भावा
DeleteNana Lay bhari 👌👌
ReplyDeleteधन्यवाद दत्त्या भावा
DeleteNice bro
ReplyDeleteछान
ReplyDeleteचंदया भावा.....
DeleteKeep it up bhau... Just dont let any of them go... "TI" la pan ani tujhya #shabdanchya" kalela pan... All the best...
ReplyDeleteThanks bro, for your valuable comment and appreciation.
DeleteThanks Shubham
ReplyDeleteThanks to all of you
ReplyDeleteGood One yaar
ReplyDeletemast.....
ReplyDelete