सुचायला काय हो...! |
सुचायला काय हो... सुचत जातं
कागदावर मात्र उतरत नाही सगळं...
तिच्यावर इतकं लिहून झालंय की
वाटतं, आता आणखी काय लिहू वेगळं?
तरीही मनाला समजावतो मी
शोधून काढतो काही नवं..
चार ओळी लिहिल्या कि वाटतं बरं
आणखी थोडं लिहायला हवं असं वाटत खरं...
लिहिता लिहिता पुन्हा तसं
नवीन लिहून जातो कधी कधी...
पुन्हा वाटू लागतं मध्येच
हेही लिहून झालंय आधी....
माझ नि माझ्या मनाचं भांडण
असंच कायम चालू असतं
म्हणून कदाचित कधी कधी
वेगळंच काही लिहीत असत....
-कृष्णाई-
No comments:
Post a Comment